Homeगडचिरोलीराहुल लोकविकास मंडळाच्या वतीने रंगारंग सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात संपन्न

राहुल लोकविकास मंडळाच्या वतीने रंगारंग सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात संपन्न

सोनू वाळके,उपसंपादक, लोकवाद न्युज.

Oplus_131072
Oplus_131072

चामोर्शी : राहुल लोकविकास मंडळ, चामोर्शी अंतर्गत संचालित यशोधरा विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय, निशिगंधा इंग्लिश स्कूल, बा. म. सहारे उच्च प्राथमिक शाळा तसेच राहुल मुलांचे वस्तीगृह यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेला भव्य सांस्कृतिक कार्यक्रम मोठ्या उत्साहात व जल्लोषात पार पडला. कार्यक्रमास पालकांसह परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावून बाल कलाकारांच्या कलागुणांना दाद दिली.

कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने करण्यात आली. यावेळी प्रल्हाद दुबे, विजय कोमेवार, मधुकरजी बोधलकर, बबनराव वडेट्टीवार, राजेश ठाकूर व किशोर ओल्लालवार यांचा सत्कार करण्यात आला. तसेच सेवानिवृत्त मुख्याध्यापिका माया तायवाडे, सेवानिवृत्त कनिष्ठ लिपीक यु. बी. वाळके, सेवानिवृत्त शिपाई रुपलता शेंडे आणि श्री. संतोष नैताम यांचे आई-वडील लक्ष्मण नैताम यांचाही राहुल लोकविकास मंडळाच्या वतीने गौरव करण्यात आला.

कार्यक्रमाच्या मंचावर मंडळाच्या अध्यक्षा कौशल्या सहारे, सचिव विवेक सहारे, कोषाध्यक्ष वक्तुजी उंदिरवाडे, माणिक साखरे, रेखा साखरे, प्राचार्य शाम रामटेके, प्राचार्या संचालिका वालदे, मुख्याध्यापिका सुजाता रामटेके, अधिक्षक रेवनदास उंदिरवाडे, सेवानिवृत्त न्यायाधीश अशोक भैसारे, कुंदा भैसारे यांची प्रमुख उपस्थिती होती.

तीन दिवस चाललेल्या या सांस्कृतिक सोहळ्यात विद्यार्थ्यांच्या नृत्य सादरीकरणाने कार्यक्रमात विशेष रंगत निर्माण केली. वैयक्तिक तसेच समूह नृत्य सादरीकरणाने उपस्थितांची मने जिंकली. कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी विद्यार्थ्यांना विविध पारितोषिकांचे वितरण करण्यात आले.

या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य शाम रामटेके, संस्थेचे सचिव विवेकभाऊ सहारे, अध्यक्षा कौशल्या सहारे यांच्यासह माणिक साखरे, रेखा साखरे, कोषाध्यक्ष वक्तुजी उंदिरवाडे, पत्रकार बबनराव वडेट्टीवार, राजेश ठाकूर, ज्येष्ठ शिक्षक राजू धोडरे व प्रा. प्रेमानंद वालदे उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी प्रवीण नैताम, गुरुदेव सातपुते, लोकनाथ दुधबळे, निलेश क्षीरसागर, सरिता आखाडे, जयश्री कोठारे, आशा उंदिरवाडे, करुणा रामटेके व आनंद रामटेके यांनी मोलाचे सहकार्य केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. प्रविण गव्हारे यांनी केले, तर आभारप्रदर्शन प्रा. भांडेकर यांनी मानले.

lokwad
lokwadhttps://lokwad.in/
दुर्योधन विलास घोंगडे मुख्य संपादक mob. 9881197843
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments