चामोर्शी(प्रतिनिधी) ::- प्रा.विनायक धानोरकर अध्यक्ष झाडीबोली साहित्य मंडळ गडचिरोली यांचे नेतृत्वाखाली, झाडीबोली गडचिरोली शाखा चामोर्शीची समिती गठीत करण्यात आलेली आहे. सौं. भारती तितरे – अध्यक्ष श्री. सुखसागर झाडे – उपाध्यक्ष श्री. प्रदीप भुरशे – सचिव श्री. निलेश मानापुरे -सहसचिव श्री. यादव पेंदाम – कोषाध्यक्ष श्री. माणिकचंद रामटेके- सल्लागार
या वेळी मान्यवरांनी झाडीबोली साहित्य मंडळाची व्याप्ती प्रत्येक खेडोपाड्यातील घराघरा पर्यंत झाडी बोलीचे महत्व पोहचवून झाडी बोली भाषेला अग्रस्थानी पोहचवून येत्या काळात झाडी बोलीला अभ्यासक्रमात समाविष्ट करण्याचा मानस उपस्थित मान्यवरांनी विषद केला. 2025 या वर्षीचे झाडीबोली साहित्य संमेलन झाडीबोली केंद्रीय समिती साकोली यांचे निर्णयानुसार गडचिरोली जिल्ह्यातील मौजा काटली येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक केंद्र शाळेत साहित्य संमेलन दिनांक 27 डिसेंबर शनिवार व 28 डिसेंबर रविवार रोजी आयोजित केलेले आहे.