HomeBreaking Newsघोट नवोदय विद्यालयात अधिकारांचा गैरवापर? प्राचार्या यांच्या कारभारावर प्रश्नचिन्ह”.

घोट नवोदय विद्यालयात अधिकारांचा गैरवापर? प्राचार्या यांच्या कारभारावर प्रश्नचिन्ह”.

सोनू वाळके,उपसंपादक, लोकवाद न्युज.

नवोदय विद्यालयात खोट्या प्रमाणपत्रांचा वाटप?
घोट–गडचिरोली येथील प्राचार्या यांच्या मनमानी कारभाराची चौकशीची जोरदार मागणी.

“खोट्या प्रमाणपत्रांच्या आधारे नोकरी मिळवणारी व्यक्ती केवळ कायद्याची थट्टा करत नाही, तर खऱ्या अर्थाने पात्र, इमानदार आणि गरजू व्यक्तीच्या तोंडचा घास हिरावून घेत आहे. ही केवळ फसवणूक नसून समाजाच्या न्यायव्यवस्थेवरचा काळा डाग आणि व्यवस्थेची शोकांतिका आहे.”

Oplus_131072

प्रतिनिधी | घोट, गडचिरोली
जवाहर नवोदय विद्यालय, घोट (जि. गडचिरोली) येथे प्राचार्या  यांनी पदाचा दुरुपयोग करून गंभीर स्वरूपाचा गैरप्रकार केल्याचा आरोप समोर आला असून, या प्रकरणाची तातडीने उच्चस्तरीय चौकशी करून त्यांना निलंबित करण्याची मागणी सर्व स्तरांतून होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नवोदय विद्यालय समिती, दिल्ली यांच्या मार्फत संपूर्ण भारतात मेस हेल्पर पदासाठी कायमस्वरूपी भरती प्रक्रिया सुरू आहे. या भरतीत खरोखर मेस मध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना न्याय मिळावा, या उद्देशाने नवोदय प्रशासनाने संबंधित शाळेच्या प्राचार्यांना अनुभव प्रमाणपत्र देण्याचा अधिकार दिला होता.
परंतु या अधिकाराचा गैरवापर करत, प्राचार्या  यांनी ज्या व्यक्तीने मेस मध्ये एकही दिवस स्वयंपाक अथवा मदतनीस म्हणून काम केलेले नाही, अशा व्यक्तीस तब्बल ११ वर्षे मेस मध्ये कार्य केल्याचे खोटे प्रमाणपत्र दिल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. संबंधित व्यक्ती प्रत्यक्षात ऑफिस कामासाठी नियुक्त असल्याचे स्पष्ट असतानाही, कार्यालयीन कर्मचाऱ्याशी संगनमत करून खोटे प्रमाणपत्र देत नवोदय विद्यालय समिती, दिल्ली तसेच जिल्हा प्रशासनाची दिशाभूल केल्याचा आरोप आहे.

 सुट्टीच्या दिवशी प्रमाणपत्र? जावक क्रमांकही संशयास्पद

या प्रकरणातील आणखी धक्कादायक बाब म्हणजे, १४ सप्टेंबर २०२५ (रविवार) — शाळा बंद असलेल्या सुट्टीच्या दिवशी प्रमाणपत्र देण्यात आले आहे. सदर प्रमाणपत्राचा जावक क्रमांकही खोटा असण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात असून, यामुळे संपूर्ण प्रकार अधिकच संशयास्पद बनला आहे.

 मनमानी कारभार, कर्मचाऱ्यांचा गैरवापर.

प्राचार्या  या केवळ पाच–सहा महिन्यांपूर्वीच घोट येथील नवोदय विद्यालयात रुजू झाल्या असून, आल्यापासून त्यांनी मनमानी पद्धतीने कारभार सुरू केल्याचे आरोप  होत आहेत.
विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक व मूलभूत सुविधांकडे दुर्लक्ष करून, कर्मचाऱ्यांना स्वतःच्या खासगी घरात २४ तास कामाला जुंपल्याचे, तसेच पदाचा गैरवापर करून नको ते काम केल्याचेही आरोप समोर आले आहेत.

 निधीचा गैरवापर? विद्यार्थ्यांच्या गरजांकडे दुर्लक्ष

जवाहर नवोदय विद्यालय, घोट ही शाळा गेल्या अनेक वर्षांपासून वनविभागाच्या जागेवर उभी असून, पूर्वी कोणत्याही नवीन बांधकामास परवानगी नव्हती. परंतु उप-प्राचार्य गजबिये यांच्या प्रयत्नाने ते शक्य झाले,मात्र अलीकडे बांधकामास परवानगी व निधी मिळाल्यानंतर, विद्यार्थ्यांच्या दैनंदिन गरजेच्या संडास-बाथरूम व निवास सुविधांकडे दुर्लक्ष करून, प्राचार्यांच्या वैयक्तिक ऑफिससाठी मोठ्या प्रमाणात निधी खर्च केल्याचा आरोप केला जात आहे.

प्रशासन व लोकप्रतिनिधी गप्प का?

देशभरात सुमारे ६०० जवाहर नवोदय विद्यालये असून, प्रत्येक शाळेच्या व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष जिल्हाधिकारी, तर खासदार व आमदार हे सदस्य असतात. असे असतानाही, या गंभीर प्रकरणात कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याने जिल्हा प्रशासन व राजकीय दबावामुळे प्राचार्यांना अभय दिले जात आहे का? असा सवाल उपस्थित होत आहे.

बडतर्फीची मागणी तीव्र
या संपूर्ण प्रकरणामुळे पालकवर्ग, विविध संघटना व सामाजिक कार्यकर्त्यांमध्ये तीव्र संतापाचे वातावरण असून,
➡️ प्राचार्या  यांना तात्काळ निलंबित करावे,
➡️ खोटे प्रमाणपत्र प्रकरणाची स्वतंत्र व निष्पक्ष चौकशी करावी,
➡️ दोषी आढळल्यास सेवेतून बडतर्फ करावे,
अशी जोरदार मागणी होत आहे.

 

(कोट ):- प्राचार्य ममता लांजेवार यांनी प्रतिक्रिया देताना मान्य केले की, नवोदय विद्यालय घोट येथे ऑफिस बॉय म्हणून कार्यरत असलेल्या संबंधित मुलाला मेस हेल्परचे प्रमाणपत्र देण्यात आले आहे. या प्रकारावरून संबंधित मुलाशी साठगाठ करून प्रमाणपत्र देण्यात आल्याचा संशय व्यक्त होत असून, संपूर्ण प्रकरण गंभीर असून चौकशीची गरज असल्याचे स्पष्ट होते.

__________________________________________

lokwad
lokwadhttps://lokwad.in/
दुर्योधन विलास घोंगडे मुख्य संपादक mob. 9881197843
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments