कार्मिल अकॅडमी येथील सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात पार
चिमकल्यांनी केले उपस्थित प्रेक्षकांना मंत्रमुग्ध

सोनू वाळके लोकवाद : कार्मेल अकॅडमी, चामोर्शी येथे शैक्षणिक वर्ष 2025–2026 चा वार्षिक सांस्कृतिक कार्यक्रम मोठ्या उत्साहात व जल्लोषात पार पडला. नर्सरीपासून दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या नृत्य, नाट्य व सांस्कृतिक कलाकृतींनी उपस्थितांची मने जिंकली.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी फादर पॉल वलियपरंबिल सीएमआय (अध्यक्ष, सीएमआय सेवा सोसायटी) हे होते. प्रमुख पाहुणे म्हणून मा. श्री. अरुण एम. (उपविभागीय दंडाधिकारी व सहाय्यक जिल्हाधिकारी, चामोर्शी) आणि प्रमुख म्हणजे प्राचार्य father wilson वर्गिस यांनी उपस्थित राहून विद्यार्थ्यांच्या कला सादरीकरणाचे कौतुक केले.
सन्माननीय पाहुणे म्हणून
श्रीमती जयश्री वायलालवार (अध्यक्षा, नगर पंचायत, चामोर्शी),
कल्याणी पुठेंवार मॅडम (पोलीस उपनिरीक्षक, चामोर्शी),डॉ अचिंत बिस्वास,
श्री. सुधीर आखाडे (बीईओ, चामोर्शी)
यांनी कार्यक्रमाला उपस्थित राहून विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले.
नर्सरीपासून दहावीपर्यंतच्या चिमुकल्या मुला-मुलींनी उत्तम वेषभूषेत सादर केलेली नृत्याविष्कार, सांस्कृतिक कार्यक्रम व नाट्यप्रयोग विशेष आकर्षण ठरले. विद्यार्थिनींनी केलेले अँकरिंग आत्मविश्वासपूर्ण व प्रभावी होते. तसेच स्टेज लाइटिंग व सजावट प्रेक्षकांना भारावून टाकणारी होती.
कार्यक्रमातील विशेष आकर्षण ठरले ते इयत्ता ९वीच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेले ‘संभाजी महाराज’ यांच्यावर आधारित ‘छावा’ चित्रपट प्रेरित सादरीकरण, ज्याने उपस्थितांना अक्षरशः मंत्रमुग्ध केले.
या यशस्वी कार्यक्रमासाठी शिक्षकवृंदांनी घेतलेली मेहनत उल्लेखनीय ठरली. तसेच शाळेतील स्वीपर कर्मचारी, काम करणाऱ्या महिला, सुरक्षा रक्षक काका यांनी दिलेल्या योगदानामुळे कार्यक्रम नियोजनबद्ध आणि यशस्वीरीत्या पार पडला.
कार्मेल अकॅडमी, चामोर्शीचा हा वार्षिक कार्यक्रम म्हणजे शैक्षणिक गुणवत्तेसोबत सांस्कृतिक विकासाला चालना देणारा आदर्श उपक्रम ठरला असून पालक व नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात प्रशंसा होत आहे.सगळ्या पालक वर्ग आणि शिक्षक वृदांनी प्राचार्य यांचे कौतुक करून BEST PRICIPLE अवॉर्ड सुद्धा देऊन त्यांचं गौरव केले आणि असच यश संपादन करून मुलांना योग्य मार्ग मिडेल योग्य क्षेत्रात जाणार अशी मुलं घडले पाहिजे अशे कारमेल अकॅडमी चे प्राचार्य यांनी आपले मनोगत व्यक्त केले सर्व पालक वर्ग आणि शिक्षक वृंद यांनी सुद्धा कौतुक केले असून कारमेल अकॅडमी च नाव हे दूरवर नेतील अशे त्यांचे मत आहे.