चामोर्शी(प्रतिनिधी) -यशोधरा विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय चामोर्शी येथे संत गाडगे महाराज यांचा स्मृती दिन साजरा करण्यात आली. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी प्राचार्य शाम रामटेके होते . प्रमुख अतिथी म्हणुन ज्येष्ठ शिक्षक राजु धोडरे , गुरुदेव सातपुते, प्रा. प्रेमानंद वालदे यांनी संत गाडगे महाराज यांच्या जीवनावर प्रकाश टाकला. अध्यक्षीय भाषणात प्राचार्य शाम रामटेके यांनी संत गाडगे महाराज यांच्या विविध पैलुंवर भाष्य करत आपण गाडगे महाराजांनी दिलेला स्वच्छतेचा संदेश अंगिकारून , जुन्या अनिष्ठ रुढी परंपरांना मुठमाती देत वैज्ञानिक दृष्टीकोन स्विकारला पाहिजे तसेच सर्व विद्यार्थ्यांनी शिक्षणाची कास धरून स्वतःच्या प्रगतीसोबतच देशाच्या प्रगतीत हातभार लावला पाहिजे असा मौलीक संदेश दिला. संचालन जयश्री कोठारे तर आभार प्रा. प्रविण गव्हारे यांनी मानले . कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रविण नैताम, निलेश क्षिरसागर,लोकनाथ दुधबळे, प्रा. प्रदीप भांडेकर, लक्ष्मण गव्हारे, करुणा रामटेके, आशाताई उंदीरवाडे यांनी सहकार्य केले .