Homeगडचिरोलीमार्कंडादेव येथे संत गाडगेबाबांना पुण्यतिथी साजरी

मार्कंडादेव येथे संत गाडगेबाबांना पुण्यतिथी साजरी

उपसंपादक लोकवाद : मार्कंडादेव येथे चामोर्शी तालुक्यातील धोबी समाजाच्या वतीने संत गाडगेबाबांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या मूर्तीला पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले. संत गाडगेबाबांनी समाजात स्वच्छता, शिक्षण, समता व प्रबोधनाचा जो संदेश दिला, त्यांचा आदर्श आजही समाजाला दिशा देणारा असल्याचे मत यावेळी उपस्थितांनी व्यक्त केले.
या कार्यक्रमास नगरसेविका रोशनीताई स्वप्निल वरघंटे (चामोर्शी), श्रीमती मंदाताई वरघंटे, सौ. किशोरीताई मोते, श्री. नितेशभाऊ गट्टीवार, श्री. सुधीरभाऊ गडपायले, श्री. राजेशभाऊ मानपल्लीवार, श्री. महेश गट्टीवार, श्री. राजू केळझरकर, श्री. सुधाकर लोणारे, श्री. बंटी माथनकर, शुभम राहुलवार यांच्यासह चामोर्शी येथील समस्त धोबी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमादरम्यान संत गाडगेबाबांच्या विचारांचा जागर करत समाजात स्वच्छता, शिक्षण आणि सामाजिक एकतेचा संदेश पुढे नेण्याचा संकल्प करण्यात आला. उपस्थित मान्यवरांनी संत गाडगेबाबांच्या कार्याचा गौरव करत त्यांच्या विचारांची आजच्या पिढीने अंमलबजावणी करण्याचे आवाहन केले.

lokwad
lokwadhttps://lokwad.in/
दुर्योधन विलास घोंगडे मुख्य संपादक mob. 9881197843
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments