विश्वशांती विद्यालय भेंडाळा येथे संत गाडगे महाराज पुण्यतिथी साजरी
चामोर्शी (प्रतिनिधी) लोकवाद : दिनांक २० डिसेंबर २०२५ रोजी शनिवारला विश्वशांती विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय, भेंडाळा येथे आनंददायी शनिवार उपक्रमांतर्गत थोर समाजसुधारक संत गाडगेबाबा यांच्या पुण्यतिथीनिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री. भोपासिंग पवार उपस्थित होते. प्रमुख पाहुणे म्हणून शाळेचे मुख्याध्यापक श्री. अरुण राऊत, पर्यवेक्षक श्री. संतोष सुरावार, श्री. प्रशांत घरत यांची उपस्थिती लाभली. तर कार्यक्रमाच्या प्रमुख मार्गदर्शक म्हणून श्रीमती ममता सातपुते उपस्थित होत्या. कार्यक्रमाची सुरुवात संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली. यानंतर शाळेतील विद्यार्थ्यांनी संत गाडगेबाबा यांच्या जीवनकार्यावर आधारित मनोगत सादर करून त्यांच्या समाजसुधारणेच्या कार्यावर प्रकाश टाकला. प्रमुख मार्गदर्शक ममता सातपुते यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणातून संत गाडगेबाबा यांच्या स्वच्छता चळवळ, सामाजिक समता, व्यसनमुक्ती आणि शिक्षणाविषयीच्या विचारांची सविस्तर माहिती विद्यार्थ्यांना दिली. त्यांच्या कार्यातून विद्यार्थ्यांनी सामाजिक बांधिलकी जपण्याचे आवाहन त्यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन वैभव आईंचवार यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी मोलाचे सहकार्य केले.