Homeगडचिरोलीबुध्दिष्ठ सोसायटीच्या राज्य सहसचिवपदी अ‍ॅड. सोनाली मेश्राम यांची निवड

बुध्दिष्ठ सोसायटीच्या राज्य सहसचिवपदी अ‍ॅड. सोनाली मेश्राम यांची निवड

सोनू वाळके,उपसंपादक, लोकवाद न्युज.

 

गडचिरोली : बुध्दिष्ठ सोसायटीच्या राज्यस्तरीय कार्यकारिणीची नव्याने घोषणा करण्यात आली असून, गडचिरोली येथील सुप्रसिद्ध विधिज्ञ अ‍ॅड. सोनाली मेश्राम यांची राज्य सहसचिव पदी निवड करण्यात आली आहे. सामाजिक, शैक्षणिक व संविधानिक मूल्यांच्या प्रसारासाठी कार्यरत असलेल्या बुध्दिष्ठ सोसायटीत त्यांची ही निवड महत्त्वाची मानली जात आहे.

अ‍ॅड. सोनाली मेश्राम या गेल्या अनेक वर्षांपासून कायदा क्षेत्रात कार्यरत असून, सामाजिक न्याय, महिला हक्क, वंचित घटकांचे प्रश्न तसेच संविधानिक अधिकारांबाबत त्यांनी सातत्याने भरीव काम केले आहे. त्यांच्या अनुभवाचा आणि कार्यकुशलतेचा लाभ आता राज्य पातळीवर सोसायटीच्या कार्याला मिळणार असल्याचा विश्वास व्यक्त केला जात आहे.

या निवडीबद्दल गडचिरोली जिल्ह्यातील सामाजिक, शैक्षणिक व विधी क्षेत्रातील मान्यवरांनी अ‍ॅड.सोनाली मेश्राम यांचे अभिनंदन केले आहे. बुध्दिष्ठ विचारधारेचा प्रसार, युवकांचे प्रबोधन, तसेच सामाजिक समतेसाठी राज्यभर अधिक प्रभावीपणे कार्य करण्याचा संकल्प त्यांनी यावेळी व्यक्त केला.

अ‍ॅड. सोनाली मेश्राम यांच्या निवडीमुळे गडचिरोली जिल्ह्याचा मान वाढला असून, बुध्दिष्ठ सोसायटीच्या कार्याला नवी दिशा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

lokwad
lokwadhttps://lokwad.in/
दुर्योधन विलास घोंगडे मुख्य संपादक mob. 9881197843
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments