उपविभागीय अधिकारी व तहसीलदार यांनी तात्काळ लक्ष घालावे अशी नागरिकांची मागणी.
सामान्य जनतेला आरोग्याचा त्रास,भरपाई देणार कोण ?
चामोर्शी (गडचिरोली) : येथील शारदा राईस मिलमधून निघणाऱ्या धूर व राखेने संपूर्ण मागील परिसर अक्षरशः दूषित झाला असून, हनुमान वॉर्डातील सोमनकार लेआऊटपासून ते जुन्या तहसील कार्यालयापर्यंत राहणाऱ्या नागरिकांच्या आरोग्याला गंभीर धोका निर्माण झाला आहे. दमा, श्वसनाचे आजार, डोळ्यांची जळजळ, सतत खोकला यांसारख्या तक्रारींमध्ये मोठी वाढ झाल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे.
सध्या शेतकऱ्यांचे धान उत्पादन बाजारात आले असून राईस मिलमध्ये दळणाची प्रक्रिया वाढली आहे. परिणामी मिलमधून निघणारा धूर व राख दिवस-रात्र परिसरात पसरत असून नागरिकांना घरात बसणेही कठीण झाले आहे. लहान मुले, नवजात बालके, वृद्ध नागरिक आणि दमा रुग्ण यांना या प्रदूषणाचा सर्वाधिक फटका बसत आहे. अनेक नागरिकांना महिन्यातून वारंवार दवाखान्याची पायरी चढावी लागत असल्याचे वास्तव आहे.
विशेष म्हणजे काही वर्षांपूर्वी येथील नागरिकांनी एकत्र येऊन संबंधित प्रशासनाकडे व राईस मिल मालकाकडे तक्रार दाखल केली होती. त्यावेळी “योग्य उपाययोजना करण्यात येईल” असे आश्वासन देण्यात आले; मात्र प्रत्यक्षात कोणतीही ठोस कार्यवाही झाली नाही. उलट दिवसेंदिवस प्रदूषणाचा त्रास वाढतच चालला आहे.
स्थानिक नागरिकांच्या मते, राईस मिल व्यवस्थापनाला लोकांच्या जीवाशी काहीही देणेघेणे नसल्याचे दिसून येत आहे. प्रदूषण नियंत्रणासाठी आवश्यक यंत्रणा बसवण्यात आलेली नसून, नियमांची पायमल्ली सर्रास सुरू आहे. प्रशासनाचे संपूर्ण दुर्लक्ष आणि मिल मालकांची उदासीनता यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. शारदा राईस मिलची राखळ घराघरात; भांडी, कपडे, कारही प्रदूषणाच्या विळख्यात
येथील शारदा राईस मिलमधून निघणाऱ्या धूर व राखेमुळे मागील वसाहतीतील नागरिक अक्षरशः हैराण झाले आहेत. मिलच्या मागील परिसरातील घरांमध्ये भांडी, कपडे, पाणी साठवणूक भांडे, वाहनांवरही राखेचा थर साचत असून स्वच्छतेचा प्रश्न गंभीर बनला आहे.
हनुमान वॉर्ड, सोमनकार लेआऊटपासून जुन्या तहसील कार्यालय परिसरापर्यंत राख व धूर पसरत असल्याने नागरिकांना रोजच घराची साफसफाई करावी लागत आहे. घराबाहेर ठेवलेली भांडी, वाळत घातलेले कपडे, तसेच कार व दुचाकींवर काळी राख साचलेली दिसून येत आहे. परिणामी नागरिकांच्या आरोग्यासोबतच दैनंदिन जीवनमानावरही मोठा परिणाम होत आहे.
स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, मिलमध्ये दळण वाढल्यापासून प्रदूषणही प्रचंड वाढले आहे. राख व धूर थेट घरांमध्ये शिरत असल्याने श्वसनाचे त्रास, डोळ्यांची जळजळ, खोकला यांसारख्या तक्रारी वाढत आहेत. लहान मुले, वृद्ध आणि दमा रुग्ण यांना याचा अधिक त्रास सहन करावा लागत आहे.
यापूर्वी नागरिकांनी तक्रारी करूनही मिल व्यवस्थापनाकडून कोणतीही ठोस उपाययोजना करण्यात आलेली नाही. प्रदूषण नियंत्रणाच्या नियमांकडे सर्रास दुर्लक्ष होत असून प्रशासनाची भूमिका मात्र संशयास्पद ठरत आहे.
घराघरात राख पोहोचली तरी प्रशासन गप्प का?
नागरिकांनी प्रदूषण नियंत्रण मंडळ व स्थानिक प्रशासनाकडे तात्काळ कारवाईची मागणी केली असून, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.
आता तरी प्रशासन जागं होणार का?
प्रदूषण नियंत्रण मंडळ, नगरपंचायत व आरोग्य विभाग यांनी तात्काळ हस्तक्षेप करून शारदा राईस मिलवर कठोर कारवाई करावी, अशी जोरदार मागणी परिसरातील नागरिकांकडून होत आहे. अन्यथा नागरिकांना आंदोलनाचा मार्ग अवलंबावा लागेल, असा इशाराही देण्यात येत आहे.