Homeगडचिरोलीजिल्ह्यात लोकप्रतिनिधी–प्रशासनाचे जनतेकडे दुर्लक्ष; ‘मलाई’च्या कामांकडेच विशेष लक्ष

जिल्ह्यात लोकप्रतिनिधी–प्रशासनाचे जनतेकडे दुर्लक्ष; ‘मलाई’च्या कामांकडेच विशेष लक्ष

सोनू वाळके,उपसंपादक, लोकवाद न्युज.

लोकप्रतिनिधी व्यस्त… पण फक्त ‘फायद्याच्या फाइलांमध्ये’!”

🔥 “सामान्यांची व्यथा धुळीत, ‘विशेष कामं’ मात्र फुल स्पीडमध्ये!”

Oplus_131072

चामोर्शी/गडचिरोली :

जिल्ह्यातील सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न दिवसेंदिवस गंभीर बनत असताना, स्थानिक लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाचे याकडे सुरू असलेले उघड दुर्लक्ष आता जनतेत प्रचंड नाराजी निर्माण करत आहे. नागरिकांच्या मूलभूत गरजा — रस्ते, पिण्याचे पाणी, आरोग्यसेवा, वाहतूक, सार्वजनिक सोयी— हे प्रश्न वर्षानुवर्षे प्रलंबित असताना त्यांचे निराकरण करण्याची जबाबदारी नेमकी कोणाची, असा सवाल जनतेतून मोठ्या प्रमाणात उपस्थित केला जात आहे.

याच्या उलट, जेथे ‘मलाई’ असते अशा कामांकडे—CC रोड टेंडर, इमारतींची बांधकामे, नवीन सरकारी प्रकल्प, मोठे निधीयुक्त काम—याकडे मात्र लोकप्रतिनिधी आणि काही भ्रष्ट प्रशासकीय अधिकाऱ्यांचे अतोनात प्रेम दिसते. टेंडर निघायच्या आधीपासूनच काही निवडक मंडळी संबंधित कार्यालयांत फेरफटका मारताना दिसतात, फायलींना वेग चढतो, पाहणी दौरे तातडीने होतात, आणि लक्षवेधी बैठका झपाट्याने घेतल्या जातात.

परंतु याच वेळी, सर्वसामान्य माणूस दररोज वणवण फिरतो—

रस्ता दुरुस्त करा,

नाली साफ करा,

पाणीपुरवठा सुरू करा,

दवाखाना सुरू ठेवा,

वाहतूक व्यवस्था सुधारा,

वीज समस्येवर कारवाई करा…

या मूलभूत प्रश्नांवर मात्र प्रशासन आणि लोकप्रतिनिधी निर्विकार दिसतात. फक्त आश्वासने देणे आणि फोटोसेशनसाठी येणे एवढ्यापुरतीच त्यांची भूमिका मर्यादित असल्याचे वास्तव जनतेसमोर उघडे पडले आहे.

कामात पारदर्शकता नसल्यामुळे टेंडरमधील दलाली, प्रकल्पांची तडजोड आणि अपूर्ण कामे हे जिल्ह्यातील ‘ओळखीचे वास्तव’ बनले असून, याचे सर्वाधिक फटके सामान्य नागरिकांना बसत आहेत. गावातील अर्धवट CC रस्ते, उघड्यावर सोडलेल्या नाल्या, वाळलेल्या पाइपलाइन, बंद दवाखाने, अपूर्ण शासकीय इमारती… हे सर्व चित्र आज प्रशासनाच्या निष्क्रियतेचे थेट उदाहरण बनले आहे.

जनतेचा स्पष्ट सवाल —

“जे कामांमध्ये जनहित आहे त्याकडे उदासीनता,

आणि जे कामांमध्ये आर्थिक फायद्याची शक्यता आहे त्यात जास्तीची धावपळ —

हेच का विकासाचं नवीन मॉडेल?”

सामान्य जनता बदलाची मागणी करत असताना, संबंधित लोकप्रतिनिधी आणि अधिकारी यांचे मौन आता संशय निर्माण करत आहे. जनतेच्या पैशातून होणाऱ्या प्रत्येक कामाला पारदर्शकता येईपर्यंत आणि दैनंदिन प्रश्नांना प्राधान्य मिळेपर्यंत हा असंतोष वाढतच जाईल, हे निश्चित.

lokwad
lokwadhttps://lokwad.in/
दुर्योधन विलास घोंगडे मुख्य संपादक mob. 9881197843
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments