HomeBreaking Newsचामोर्शीतील महामार्गावर वाहतूक कोंडीचा कहर; प्रशासनाचे अजब दुर्लक्ष

चामोर्शीतील महामार्गावर वाहतूक कोंडीचा कहर; प्रशासनाचे अजब दुर्लक्ष

सोनू वाळके,उपसंपादक, लोकवाद न्युज.

 – सुरजागड ट्रकच्या जड वाहतुकीची वर्दळ जनतेचा संताप उफाळला

सुरजागड ट्रकची अनियंत्रित वाहतूक; चामोर्शी महामार्ग कोंडला, प्रशासनावर नागरिकांचा संताप

चामोर्शी/गडचिरोली

चामोर्शी शहरातील नॅशनल हायवे आज मृत्यूचा महामार्ग ठरत चालला आहे.

रस्ता अरुंद, हायवे लगत दुकानांची दाटी, आणि रस्त्याच्या कडेला वाहनांची मनमानी पार्किंग—या तिन्ही गोष्टींनी चामोर्शीतील वाहतूक पूर्णपणे कोलमडली आहे. त्यात सुरजागड प्रकल्पाकडे जाणाऱ्या जड ट्रकांची अखंड वर्दळ, यामुळे दररोज कोंडी, धूर, धूळ आणि अपघाताची शक्यता वाढली आहे.

कालच गडचिरोली नयेथें गर्दीत B-Fashion प्लाझाजवळ एक दुर्दैवी घटना घडली—

कारमेल स्कूलच्या बांबोळे मॅडम यांचा ट्रकच्या धडकेत मृत्यू झाला

ही शोकांतिका संपूर्ण शहराला हादरवून गेली.

तेवढ्यातच प्रश्न उभा राहिला—ही जीवहानी जबाबदार कुणी?

प्रशासनाकडून फक्त MIDC आणि कंपन्यांच्या मागे धाव,

तर नागरिकांच्या मूलभूत सुविधांकडे मात्र ढिम्म लक्ष नाही.

जिल्ह्याला “औद्योगिक जिल्हा” म्हणून मोठ्ठ्या गोष्टी मांडल्या जातात,

-पण वास्तव मात्र कडवे—

-कुठे योग्य रस्ते नाहीत

-कुठे पूल अर्धवट सोडले

-कुठे खड्ड्यांचे साम्राज्य

-कुठे धुळीत लोकांचे श्वास घुटमळतात

-आरोग्य, शिक्षण, रोजगार—सर्वच मागे

लोकप्रतिनिधींच्या आश्वासनांची फुगीर हवा निघून गेली आहे.

वास्तविक विकासाऐवजी, फक्त कागदी विकासाचा ढोल पिटला जात आहे.

गरिबांच्या अर्जांना प्रशासनाच्या दालनात तासन्तास थांबावे लागते.

जनतेकडे पाहण्यासाठी कोणाच्याही नजरा वळत नाहीत,

तर मोठे ठेके, मोठी कामे आणि मोठी कमाई—

याच दिशेने सगळी धडपड.

चामोर्शीतील जनतेचा एकच आवाज—

“हा कोणाचा विकास? आमच्यासाठी की ठेकेदारांसाठी?”

महामार्ग सुरक्षेची मागणी करण्यासाठी आता नागरिकांनी आवाज बुलंद केला आहे.

शहर एका अपघाताची वाट न पाहता—तातडीने उपाययोजना अपेक्षित.असे अपघात पुन्हा घडू नयेत तर प्रशासनाने तातडीने सजग होऊन, बारकाईने नियोजन करत कठोर अंमलबजावणी करणे अत्यावश्यक आहे.

तपासणी, नियमांचे पालन आणि वाहतूक नियंत्रण यासाठी ठोस पावले उचलल्याशिवाय या दुर्घटना थांबणार नाहीत.

lokwad
lokwadhttps://lokwad.in/
दुर्योधन विलास घोंगडे मुख्य संपादक mob. 9881197843
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments