Homeगडचिरोलीतालुका क्रीडा व कला स्पर्धेत जि. प. उच्च प्राथमिक शाळा घारगावचा झंझावाती...

तालुका क्रीडा व कला स्पर्धेत जि. प. उच्च प्राथमिक शाळा घारगावचा झंझावाती विजयरथ

सोनू वाळके,उपसंपादक, लोकवाद न्युज.

चामोर्शी  :
कोनसरी येथे दि. ४ ते ६ डिसेंबर २०२५ दरम्यान पार पडलेल्या तालुकास्तरीय क्रीडा व कला स्पर्धेत केंद्र भेंडाळा अंतर्गत जि. प. उच्च प्राथमिक शाळा, घारगाव येथील विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय कामगिरी करत तालुका चॅम्पियनपदावर आपले नाव सुवर्णाक्षरांनी कोरले. प्राथमिक व माध्यमिक—दोन्ही विभागांत घारगाव शाळेने घवघवीत यश संपादन करत भेंडाळा केंद्राची शान उंचावली.

क्रीडा प्रकारांत वर्चस्व :
प्राथमिक विभागातील मुलांच्या खो-खो संघाने प्रथम क्रमांक पटकावला, तर माध्यमिक विभागातील मुलांच्या खो-खो संघानेही प्रथम क्रमांक मिळवत मैदानावर वर्चस्व सिद्ध केले. माध्यमिक मुलींच्या खो-खो संघाने द्वितीय क्रमांक मिळवून पदकतालिकेत भर घातली.
रिले स्पर्धेत प्राथमिक व माध्यमिक—दोन्ही गटांतील मुले व मुलींच्या सर्व संघांनी प्रथम क्रमांक मिळवत चुरस वाढवली.

वैयक्तिक धावण्यांत चमक :
प्राथमिक गटातील १०० मी., २०० मी. आणि ३०० मीटर धावण्यात विद्यार्थ्यांनी प्रथम क्रमांक मिळवला. माध्यमिक विभागातील २०० मी., ३०० मी. आणि ४०० मीटर धावण्यातही मुला–मुलींनी अव्वल कामगिरी केली.

कला विभागातही यशाची पताका :
कला विभागात जि. प. प्राथमिक शाळा वेलतूर (तुकूम) यांनी मुलींच्या खो-खोमध्ये द्वितीय क्रमांक, तर सांस्कृतिक कार्यक्रमात प्राथमिक विभागातील समूह नृत्याने प्रथम क्रमांक पटकावला. समूहगानात जि. प. शाळा भेंडाळा प्रथम, तर माध्यमिक वैयक्तिक नृत्यात जि. प. उच्च प्राथमिक शाळा सगणापूर द्वितीय ठरली.

या बहुआयामी यशात घारगाव शाळेच्या उल्लेखनीय कामगिरीने भेंडाळा केंद्राला चॅम्पियन बनविण्यात मोलाचा वाटा उचलला.

मार्गदर्शन व सहकार्य :
या यशासाठी केंद्रप्रमुख पुरुषोत्तम पिपरे यांच्या मार्गदर्शनासह घारगाव शाळेचे मुख्याध्यापक जि. पी. गंपावार, सचिन मडावी, एस. एस. गायकवाड, एस. डी. गायकवाड तसेच शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संदीप भाऊ बोरकुटे आणि सर्व सदस्यांनी मोलाचे पाठबळ दिले.

गावचे सरपंच विवेक भगत, उपसरपंच कबीरभाऊ आभारे, पोलीस पाटील ठेमाजी आभारे, युवक मंडळातील सौरभ आभारे, चेतन झलके, पियुष आभारे, प्रशांत काटवले आणि सर्व ग्रामस्थांनी सहकार्याची साथ दिली. तसेच जि. प. उ. प्रा. शाळा वेलतूर तुकूम मुख्याध्यापक सातपुते, प्रदीप भुरसे, सेमी इंग्रजी शाळा भेंडाळाचे मुख्याध्यापक खोब्रागडे, गुरनुळे मॅडम तसेच सगणापूर येथील धुडसे सर यांनीही भेंडाळा केंद्राचा चॅम्पियनशिपपर्यंतचा प्रवास सुकर केला.

lokwad
lokwadhttps://lokwad.in/
दुर्योधन विलास घोंगडे मुख्य संपादक mob. 9881197843
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments