Homeगडचिरोलीफोकुर्डी येथे वाघाचा बैलावर हल्ला; परिसरात भीतीचे वातावरण.

फोकुर्डी येथे वाघाचा बैलावर हल्ला; परिसरात भीतीचे वातावरण.

सोनू वाळके,उपसंपादक, लोकवाद न्युज.

Oplus_131072

चामोर्शी : चामोर्शी तालुक्यातील मौजा फोकुर्डी येथे मंगळवार, दि. ९ डिसेंबर २०२५ रोजी पहाटेच्या सुमारास वाघाने बैलावर हल्ला केल्याची घटना घडली. बाबुराव झोडे (रा. फोकुर्डी) यांच्या स्वमालकीच्या गोठ्यात नेहमीप्रमाणे बांधून ठेवलेल्या बैलावर अचानक वाघाने हल्ला केल्याने बैल गंभीर जखमी झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, वाघाने २ ते ३ वेळा हल्ला करून बैलाच्या मानेवर पंजाच्या नखांनी ओरबाडले. या हल्ल्यात बैलाच्या मानेस सुमारे १ ते १.५ इंच खोल जखम झाली असून बैल रक्तबंबाळ अवस्थेत आढळून आला. संबंधित बैल अंदाजे ७ वर्षांचा असून त्याची किंमत सुमारे ५० हजार रुपये असल्याची माहिती आहे.

हल्ल्यादरम्यान बैलांच्या जोरदार आरडाओरडीतून व बैलमालकासह ग्रामस्थांची गर्दी जमल्याचे पाहून वाघाने जंगलाच्या दिशेने पलायन केल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. नंतर जमलेल्या ग्रामस्थांनी गोठ्यात पाहणी केली असता बैलाची अवस्था गंभीर असल्याचे निदर्शनास आले.

या भयावह घटनेमुळे फोकुर्डी व परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. तातडीने ग्रामस्थांनी वनविभागाशी भ्रमणध्वनीद्वारे संपर्क साधला असता, वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल होऊन पंचासमक्ष पंचनामा केला.

यावेळी ए. एस. नैताम (नि. वनपरिक्षेत्र अधिकारी, चामोर्शी), बैलमालक बाबुराव झोडे, कृष्णा ज्ञानेश्वर पाल, शानदेव झोडे, तूमदेव देहलकर तसेच वनविभागाचे अन्य अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
दरम्यान, वाघाचा वावर लक्षात घेता नागरिकांनी रात्रीच्या वेळी दक्षता घेण्याचे आवाहन वनविभागाने केले आहे.

lokwad
lokwadhttps://lokwad.in/
दुर्योधन विलास घोंगडे मुख्य संपादक mob. 9881197843
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments