भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना रक्तदानातून मानवंदना
एच.डी.एफ.सी. बँक आणि बौद्ध समाज, मूल यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिराचे यशस्वी आयोजन
लोकवाद मूल, ६ डिसेंबर: भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६७ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त, त्यांच्या मानवतेच्या आणि समाजसेवेच्या विचारांना कृतीतून मानवंदना देण्यासाठी, एच.डी.एफ.सी. बँक (शाखा – मूल) आणि बौद्ध समाज, मूल शहर यांच्या संयुक्त विद्यमाने ‘जीवनदानाचा संकल्प’ ह्या युक्तीने 51. चे वर रक्त दात्याणी रक्तदान करून शिबिर कार्यक्रम यशस्वीरित्या संपन्न झाले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना समर्पित असलेल्या या शिबिरामध्ये “रक्तदान म्हणजेच जीवनदान – एका थेंबात अनेकांचे प्राण!” हा संदेश प्रभावीपणे पोहोचवण्यात आला. या कार्यक्रमाचे उद्घाटन श्री. पुरुषोत्तम साखरे यांच्या हस्ते रिबीन कापून करण्यात आले. तर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून सामाजिक कार्यकर्ते श्री. सुजीत गुलचंद खोब्रागडे (मूल) हे प्रामुख्याने उपस्थित होते.
याप्रसंगी सामाजिक कार्यकर्ते श्री. निहाल गेडाम, श्री. डेव्हिड खोब्रागडे, श्री. काजु खोब्रागडे, श्री. हर्षवर्धन दुपारे, श्री. अतुल गोवर्धन, श्री. प्रशांत उराडे, श्री. दिलीप गेडाम, श्री. बाळू दुधे, श्री. अजय रंगारी, श्री. दिक्षांत मेश्राम, श्री. विनोद निमगडे, श्री. अनिकेत वाकडे, श्री. प्रणय रायपुरे, श्री. आयुष भडके यांच्यासह अनेक मान्यवर सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आयोजकांनी दिलेल्या माहितीनुसार, या शिबिराला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपली. या यशस्वी आयोजनाबद्दल सर्व स्तरातून आयोजकांचे आणि रक्तदात्यांचे कौतुक करण्यात येत आहे.







