चामोर्शी,/गडचिरोली — पाटबंधारे विभागाच्या अखत्यारितील नहराच्या रस्त्यालगत साचलेला कचरा व वाढलेली झुडपे यामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. वर्षानुवर्षे पाटबंधारे विभागाकडून अद्याप कचरा साफसफाई व कटाईकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप परिसरातील नागरिकांनी केला आहे.
नहराच्या रस्त्यावर काटेरी झुडपे वाढून रस्ता अरुंद झाला असून लोकांची वरदड असते , अपघातांची शक्यता वाढली आहे. पावसाळ्यात साचणारा कचरा व गाळ यामुळे दुर्गंधी, डासांचे साम्राज्य आणि आरोग्याच्या समस्या निर्माण होत आहेत. विशेष म्हणजे या नहर व रस्त्याची देखभाल ही थेट पाटबंधारे विभागाची जबाबदारी असताना, विभागाकडून केवळ कागदी कारभार सुरू असल्याची चर्चा आहे.
“दरवर्षी निधी मंजूर होतो, मात्र प्रत्यक्षात काम शून्य,” असा संतप्त सवाल नागरिक उपस्थित करत आहेत. कंत्राटदार नेमले जातात का, कामाचे मोजमाप होते का, की फक्त फाईली फिरतात — हा प्रश्न आता जनतेतून जोर धरू लागला आहे.
जर तात्काळ कचरा हटवून झुडपांची कटाई करण्यात यावी अशी मागणी होत आहे, . विकासाच्या गप्पा करणाऱ्या यंत्रणेने आता तरी जागे होऊन प्रत्यक्ष काम करावे, अशी ठोस मागणी होत आहे.