Homeगडचिरोलीरांची येथे आदिवासी एकता व संस्कृती संरक्षणावर राज्यस्तरीय बैठक — गडचिरोली जिल्ह्यातील...

रांची येथे आदिवासी एकता व संस्कृती संरक्षणावर राज्यस्तरीय बैठक — गडचिरोली जिल्ह्यातील प्रतिनिधींचा सहभाग

सोनू वाळके, उपसंपादक, लोकवाद न्युज.

 

रांची, 05 डिसेंबर 2025 : झारखंडचे मुख्यमंत्री मा. हेमंत सोरेन यांनी मुख्यमंत्री निवास, रांची येथे विविध राज्यांतील आदिवासी समाजसेवक व प्रतिनिधींसोबत विशेष बैठक घेतली. या बैठकीत आदिवासी समाजाची संस्कृती, परंपरा, युवकवर्गातील बदल, तसेच विविध सामाजिक प्रश्नांवर सखोल चर्चा करण्यात आली.

बैठकीदरम्यान मुख्यमंत्री सोरेन यांनी प्रतिपादन केले की,
“आदिवासी संस्कृती, परंपरा व ओळख जपणे ही आपल्या सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे. सर्व राज्यांतील आदिवासी बांधवांनी एकमताने आणि संघटितपणे पुढे कार्य केले पाहिजे.”

या बैठकीत गडचिरोली जिल्ह्यातील विविध ग्रामसभांचे प्रतिनिधी विशेषतः उपस्थित होते :

गडचिरोली जिल्ह्याचे प्रतिनिधी :

1. नितीन दादा पदा, पयडी (रोपी इलाका)

2. कु. चंदाताई कोरचा, शिक्षक व समाजसेविका, मंजीगड इलाका दोलंदा

3. सिसू नरोटी, ग्रामसभा चणाबोडी

4. अजय पदा, ग्रामसभा कोकडकसा

5. गणेश मटामी, ग्रामसभा केडीगटा

6. सुकाराम आतला, ग्रामसभा रोंडावाही

7. अविनाश आतला, ग्रामसभा सरांडा

8. प्रविण दररो, ग्रामसभा दोलंदा

9. सन्नु हिचामी, ग्रामसभा सीनभट्टी

10. केवलदास मडावी, ग्रामसभा कोटमी

11. जमनी पोटावी, ग्रामसभा गर्तावाही

12. रपेश आतला, ग्रामसभा सोहगाव

13. कैलाश नरोटे, ग्रामसभा कुरुमवाडा

14. देवनाथ परसे, ग्रामसभा येगंलखेड़ा

15. मनोज झुरी, ग्रामसभा हनपायली

16. गणेश कोल्हा, ग्रामसभा हनपायली

17. दलसू तुमरेटी, ग्रामसभा मोरावाही

18. संजय सिडाम, ग्रामसभा नवेझरी

19. कविता सिडाम, ग्रामसभा नवेझरी

20. रातिराम हलामी, ग्रामसभा येगंलखेड़ा

21. यशवंत परसे, ग्रामसभा येगंलखेड़ा

22. कुसुमताई आलाम, गडचिरोली

बैठकीत उपस्थित प्रतिनिधींनी आदिवासी संस्कृतीचे संरक्षण, युवकांमध्ये सजगता, परंपरागत मूल्यांचे संवर्धन आणि ग्रामस्तरावरील सामाजिक आव्हानांबाबत आपले महत्त्वपूर्ण मुद्दे मांडले.

बैठकीचा समारोप सर्व प्रतिनिधींच्या संयुक्त संकल्पाने झाला की,
“आदिवासी समाजाच्या विकासासाठी आणि सांस्कृतिक ओळख टिकवण्यासाठी सर्व राज्यांनी एकत्रितपणे आणि समन्वयाने कार्य करणे आवश्यक आहे.”

lokwad
lokwadhttps://lokwad.in/
दुर्योधन विलास घोंगडे मुख्य संपादक mob. 9881197843
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments