प्रेरणा बौद्ध मंडळ व सावित्री–रमाई महिला मंडळ, चामोर्शी यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६९ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन कार्यक्रम आयोजन
प्रेरणा बौद्ध मंडळ तथा सावित्री–रमाई महिला मंडळ, चामोर्शी यांच्या संयुक्त विद्यमाने भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६९ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आयोजित अभिवादन कार्यक्रम शनिवार, दि. ६ डिसेंबर २०२५ रोजी लुंबिनी बुद्ध विहार, चामोर्शी येथे शिस्तबद्ध वातावरणात पार पडला.
कार्यक्रमाची सुरुवात सकाळी ९ वाजता ध्वजारोहणाने करण्यात आली. ध्वजारोहण मा. इंदिरा नागदेवते (से.नि. प्राध्यापिका, चामोर्शी) यांच्या हस्ते संपन्न झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा. के. डी. मेश्राम, अध्यक्ष – प्रेरणा बौद्ध मंडळ, चामोर्शी हे होते. प्रमुख मार्गदर्शन मा. अशोक भैसारे, जिल्हा सत्र न्यायाधीश (से.नि.) ,.विनोद चांदोजी हाटकर, एकात्मिक बालविकास प्रकल्प अधिकारी हे होते.
प्रमुख अतिथी म्हणून मा. खलिर बारसागडे (से.नि. केंद्र प्रमुख, चामोर्शी) व मा. सपना खोब्रागडे, अध्यक्ष – सावित्री महिला मंडळ, चामोर्शी यांची उपस्थिती होती. यावेळी बाबासाहेबांच्या विचारांचा जागर व सामाजिक एकतेचा संदेश देणारी भिमज्योत रॅली शांतता,व प्रेरणा मिडेल अशी काढण्यात आली.
सायंकाळी 7 वाजता लुंबिनी बुद्ध विहार येथे रॅलीची सांगता झाली. त्यानंतर उपस्थित मान्यवर, उपासक व उपासीका व प्रमुख पाहुणे सामूहिक भोजनाचा कार्यक्रम पार पडला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात मा. इंदिरा नागदेवते मॅडम यांनी सुंदर असे भिमाचे गाणे सादर करून उपस्थितांना भावविभोर केले. त्यानंतर केलेल्या संक्षिप्त भाषणात त्यांनी भारतीय संविधानाचे महत्त्व, समता–स्वातंत्र्य–बंधुतेचे मूल्य व बाबासाहेबांचे योगदान यावर प्रभावी ….मा खलिर बारसागडे यांनी आपल्या भाषणातून सध्याची सामाजिक परिस्थिती, संविधानाचे स्थान तसेच राजकीय पक्ष व सत्तास्थ प्रस्थापित सरकारे आज कोणत्या पद्धतीने नीती वापरतात यावर स्पष्ट व परखड भाष्य केले.डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त प्रेरणा बौद्ध मंडळ, चामोर्शी येथे आयोजित कार्यक्रमात मा. अशोक भैसारे, जिल्हा सत्र न्यायाधीश (से.नि.) यांनी उपस्थितांना मार्गदर्शनपर भाषण केले.
त्यानंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. के. डी. मेश्राम यांनी झालेल्या सर्व भाषणांचा आढावा घेत संविधान, सामाजिक न्याय व बाबासाहेबांच्या विचारांवर सविस्तर भाष्य केले. त्यांच्या विचारपूर्ण भाषणामुळे कार्यक्रमास वैचारिक दिशा मिळाली आणि उपस्थितांमध्ये सकारात्मक संदेश पोहोचला.संविधान हे केवळ पुस्तक नसून लोकशाहीचे संरक्षण करणारे मूल्य आहे, याची जाणीव ठेवणे आवश्यक असल्याचे त्यांनी यावेळी ठामपणे मांडले,आभार वासनिक सर तसेच संचालन रीना दुधे यांनी केला.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर चालण्याचा निर्धार उपस्थितांनी यावेळी व्यक्त केला. संपूर्ण कार्यक्रम शांतता, शिस्त व सामाजिक बांधिलकी जपत यशस्वीरित्या संपन्न झाला.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त प्रेरणा बौद्ध मंडळ व सावित्री–रमाई महिला मंडळ, चामोर्शी येथे आयोजित कार्यक्रमादरम्यान पोलिस विभागाने आपली जबाबदारी अत्यंत योग्य व तत्परतेने पार पाडत सामाजिक बांधिलकी जपली. कार्यक्रमस्थळी व परिसरात चोख बंदोबस्त ठेवण्यात आला असून शांतता व सुव्यवस्थेचे काटेकोरपणे पालन करण्यात आले.
भावनिक वातावरणातही कोणताही अनुचित प्रकार घडू न देता पोलिसांनी संयम, समन्वय व दक्षतेने काम केले. त्यामुळे अभिवादन कार्यक्रम सुरळीत पार पडला असून पोलिसांच्या कार्याचे आयोजक व नागरिकांकडून कौतुक करण्यात आले.