सोनू वाळके,उपसंपादक, लोकवाद न्युज.
सर्व प्रशासकीय कार्यालय आता नियमाणेच चालले पाहिजे अशी नागरिकांची जोरदार मागणी.जनताच मालक.
चामोर्शी (उपसंपादक) —
सामान्य जनतेसाठी उपविभागीय अधिकारी (राजस्व) व तहसीलदार यांचे अधिकृत मोबाईल क्रमांक कार्यालयाच्या बाहेर स्पष्टपणे लावणे बंधनकारक असताना, चामोर्शी उपविभागीय कार्यालयात हा नियम पाळला जात नसल्याचे चित्र दिसून येत आहे. प्रशासन नागरिकांसाठी असल्याची भूमिका प्रत्यक्षात मात्र दिसत नसल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे.
प्रशासनाच्या खुर्चीवर बसताना अधिकारी हे जनतेचे सेवक असून जनता हीच खऱ्या अर्थाने मालक आहे, याची जाणीव ठेवणे आवश्यक आहे. मात्र, सध्या परिस्थिती अशी आहे की सामान्य व गरीब नागरिकांना आपल्या कामासाठी तात्काळ तासन्तास कार्यालयाच्या पायऱ्या झिजवाव्या लागतात, तर अधिकारी आपल्या सोयीने कार्यालयात ये-जा करून कामकाज करतात, अशी तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.
वेळेवर अर्ज स्वीकारणे, तक्रारींवर तत्काळ दखल घेणे आणि गरीब व गरजू लोकांची कामे वेळेत निकाली काढणे अपेक्षित असतानाही प्रत्यक्षात तसे घडत नसल्याचे वास्तव समोर येत आहे. त्यामुळे एसडीएम, तहसीलदार तसेच जिल्हाधिकाऱ्यांचे मोबाईल क्रमांक सर्वसामान्यांसाठी जाहीर रीत्या कार्यालयाबाहेर लावावेत आणि सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी—ते तहसीलदार असोत, एसडीएम असोत—ओळखपत्र (Identity Card) अनिवार्यपणे परिधान करावे, अशी ठोस मागणी नागरिकांकडून पुढे येत आहे.
प्रशासनाने नियमांची अंमलबजावणी करून वेळेवर, पारदर्शक व लोकाभिमुख सेवा द्यावी, अन्यथा जनआक्रोश तीव्र होण्याची शक्यता नाकारता येत नाही