पोलीस निरीक्षक दीपक डोंब यांची तत्परता व सकारात्मक भूमिका
चामोर्शी:-
पत्रकार संघटनेकडून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त चामोर्शी पोलीस ठाण्यास डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा भेट देण्यात आली. पोलीस निरीक्षक दीपक डोंब यांनी ही प्रतिमा स्वीकारून तत्काळ पोलीस ठाण्यात सन्मानपूर्वक लावली. प्रतिमा स्वीकारताच ती सार्वजनिक ठिकाणी लावण्याची तत्परता दाखविणे ही उल्लेखनीय बाब ठरली.
यावेळी पत्रकार संघटनेच्या वतीने पोलीस प्रशासनाकडे विनंती करण्यात आली की, पोलीस ठाण्यात येणाऱ्या प्रत्येक फिर्यादी व सर्वसामान्य नागरिकांना आपुलकीची व सन्मानाची वागणूक मिळाली पाहिजे. नागरिकांनी निर्भयपणे, विश्वासाने आणि आपुलकीने पोलीस ठाण्यात येऊन आपल्या तक्रारी मांडाव्यात, तसेच त्यांच्याशी सौजन्यपूर्ण वर्तन केले जावे, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.
याप्रसंगी पोलीस निरीक्षक दीपक डोंब यांनीही डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचे स्मरण करून कायदा व सुव्यवस्था कायम ठेवणे, जनतेशी सौजन्याने वागणे आणि संविधानाच्या चौकटीत काम करणे ही पोलीस प्रशासनाची जबाबदारी असल्याचे स्पष्ट केले. कायदा व सुव्यवस्था टिकवून त्याचे काटेकोर पालन व्हावे, अशी ग्वाही त्यांनी दिली. पोलीस निरीक्षक दीपक डोंब यांची तत्परता; बाबासाहेबांची भेट दिलेली प्रतिमा त्वरित लावून दिला सामाजिक न्याय व कायदा-सुव्यवस्थेचा ठाम संदेश
पोलीस निरीक्षक दीपक डोंब यांनी तत्परता दाखवत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची भेट दिलेली प्रतिमा त्वरित लावली. या कृतीतून त्यांनी समाजाला सकारात्मक आणि प्रेरणादायी संदेश दिला. कार्यक्रमात बोलताना त्यांनी कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवत सर्वांना समान न्याय देण्याचा निर्धार व्यक्त केला. त्यांच्या भूमिकेचे उपस्थितांकडून स्वागत करण्यात आले.
महापरिनिर्वाण दिनानिमित्त झालेल्या या उपक्रमातून सामाजिक सलोखा, संविधानिक मूल्ये आणि पोलीस–जनता नातेसंबंध अधिक दृढ करण्याचा संदेश देण्यात आला.त्यावेळी पत्रकार सोनू वाळके,उपसंपादक लोकवाद न्युज,अरुण गव्हारे दै. नवराष्ट्र शहर प्रतिनिधी
धनराज वासेकर महाराष्ट्र लाईव्ह न्यूज राज्य प्रतिनिधी मारोती बारसागडे दै. अधिकारनामा, दै नवराष्ट्र निर्माण प्रतिनिधी.प्रकाश बन्सोड, गडचिरोली न्यूज नेशन,विवेक खोब्रागडे (ASP) उपस्थित होते.