HomeBreaking Newsगडचिरोली मतदार यादीतील मोठा घोळ — वनिता बांबोळे यांची प्रशासनावर तीव्र टीका.

गडचिरोली मतदार यादीतील मोठा घोळ — वनिता बांबोळे यांची प्रशासनावर तीव्र टीका.

सोनू वाळके,उपसंपादक, लोकवाद न्युज.

गडचिरोली:-

गडचिरोली नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदार यादीतील गंभीर त्रुटी समोर येत असून अनेक नागरिकांचे नावच शासकीय मतदार यादीत नसल्यामुळे मतदारांमध्ये गोंधळाचे व मानसिक त्रासाचे वातावरण निर्माण झाले आहे. मतदानासाठी बूथवर पोहचलेल्या वयस्कर व महिला मतदारांना सर्वाधिक गैरसोय होत असल्याची माहिती समोर आली आहे.

परिवर्तन पॅनलच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार वनिता बांबोळे यांनी फुले वॉर्ड, शाहूनगर आणि गोकुळनगर येथील मतदान केंद्रांना भेट देत परिस्थितीचा प्रत्यक्ष आढावा घेतला. यावेळी मोठ्या प्रमाणात मतदारांनी आपल्या नावाच्या विलोपनासंदर्भात व चुकीच्या नाव-गाव तपशीलांबाबत तक्रारी मांडल्या.

बांबोळे यांनी या गंभीर घोळाबाबत नगर परिषद प्रशासन व निवडणूक आयोगावर तीव्र शब्दांत टीका करताना सांगितले की,
“सुरुवातीपासूनच गडचिरोली नगरपरिषद प्रशासनाचा कारभार भोंगळ असून याचा फटका थेट सामान्य मतदारांना बसत आहे. लोकशाहीतील पवित्र प्रक्रिया असलेल्या मतदानाच्या हक्कावर गदा आणणारा हा प्रकार चिंताजनक आहे.”

त्यांनी याबाबत तात्काळ चौकशी करून मतदार यादी दुरुस्तीची आपत्कालीन मोहीम राबवावी, अशी मागणी केली आहे. नागरिकांच्या मूलभूत हक्कावर गदा आणणाऱ्या या घोळाबाबत प्रशासन जबाबदार असल्याचे तीव्र आरोप करून बांबोळे यांनी अविलंब दुरुस्तीची मागणी केली आहे.

गडचिरोलीतील मतदार यादीतील या मोठ्या गोंधळामुळे निवडणूक प्रक्रियेवरील विश्वास ढासळण्याची भीती व्यक्त होत असून नागरिकांमध्ये नाराजगी पसरलेली दिसत आहे.

lokwad
lokwadhttps://lokwad.in/
दुर्योधन विलास घोंगडे मुख्य संपादक mob. 9881197843
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments