Homeचंद्रपूरविश्वशांती विद्यालय मारोडा चे विद्यार्थी विज्ञान प्रदर्शनी मध्ये चमकले.      

विश्वशांती विद्यालय मारोडा चे विद्यार्थी विज्ञान प्रदर्शनी मध्ये चमकले.      

सोनू वाळके, उपसंपादक, लोकवाद न्युज.

 

मुल(मारोडा)::-                                                                              विद्यार्थ्यामध्ये वैज्ञानिक संशोधन जागृत व्हावे त्यांच्या बुद्धिमत्तेला चालना मिळावी म्हणून दिनांक 28 व 29 नोव्हेंबर 2025 ला 53 व्या मूल तालुका स्तरीय विज्ञान प्रदर्शनी चे आयोजन महात्मा ज्योतिबा फुले विद्यालय, चिरोली येथे आयोजित करण्यात आली होती या मध्ये तालुक्यातील पूर्ण शाळां सहभागी झाल्या होत्या त्यामध्ये वेगवेगळ्या गटांमध्ये  विश्वशांती विद्यालय तथा उच्च माध्यमिक विद्यालय मारोडा ला तब्बल 6 पारितोषिक मिळाले. वर्ग ६ ते ८ बिगर आदिवासी या विभागातून कु. लावण्या आकाशकांत पाटील आणि वर्ग ९ ते १२ बिगर आदिवासी विभागातून कु. लक्ष्मी विलास शेंडे या दोघींनी तालुक्यातून प्रथम क्रमांक पटकाविला. तसेच आयोजित निबंध स्पर्धेत वर्ग ९ ते १२ या गटात कु. लक्ष्मी विलास शेंडे हिने तालुक्यातून प्रथम क्रमांक प्राप्त केला. तसेच आयोजित प्रश्नमंजुषा स्पर्धेत वर्ग ६ ते ८ या गटातून लावण्या आकाशकांत पाटील हिचा द्वितीय क्रमांक आणि वर्ग ९ ते १२ या गटातून लक्ष्मी विलास शेंडे हिने प्रथम क्रमांक पटकाविला. व प्रयोगशाळा सहाय्यक श्री. निशांत कुंटावर यांनी तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनी मध्ये तालुक्यातून प्रथम क्रमांक पटकाविला. सर्व विद्यार्थ्यांचे विद्यालयाचे प्राचार्य तथा मुख्याध्यापक धनंजय गाडेवार सर यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत व सत्कार केला तसेच सहभागी विद्यार्थी व मार्गदर्शक विषय शिक्षकांचे हार्दिक अभिनंदन आणि पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या याप्रसंगी शाळेतील सर्व शिक्षक , शिक्षिका प्राध्यापक वृंद तसेच शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. 

lokwad
lokwadhttps://lokwad.in/
दुर्योधन विलास घोंगडे मुख्य संपादक mob. 9881197843
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments