सोनू वाळके,उपसंपादक, लोकवाद न्युज.

कोनसरी (चामोर्शी) : कोनसरी परिसरात गेल्या काही महिन्यांपासून सुरु असलेला लॉयड मेटल आणि स्थानिक प्रशासनाचा दबाव, दमदाटी आणि मानसिक छळ थांबण्याचे नाव घेत नाही. शेतकऱ्यांनी आवाज उठवत चामोर्शी येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत लॉयड मेटलचे अधिकारी, आष्टी पोलीस प्रशासन, तहसीलदार आणि उपविभागीय अधिकारी यांच्या संगनमताचा मोठा खुलासा करूनही परिस्थितीत कोणताही बदल झालेला दिसत नाही.
कोनसरीत लॉयड मेटलची दादागिरी वाढती; प्रशासन–लोकप्रतिनिधींचं पाठबळ?
: कोनसरी परिसरात लॉयड मेटलची दादागिरी दिवसेंदिवस वाढत असून, त्यांच्या मनमानी कारभाराला प्रशासन आणि काही लोकप्रतिनिधींचे पाठबळ आहे का, अशी चर्चा संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यात जोर धरू लागली आहे. शेतकऱ्यांसमोरच उघडपणे गुंडगिरी, दबाव आणि मनमानी सुरू असतानाही कारवाईचा अभाव प्रश्नचिन्ह निर्माण करतोय. त्यामुळे या संगनमताच्या खेळाखाली शेतकऱ्यांचे हक्क चिरडले जात असल्याची तीव्र प्रतिक्रिया स्थानिकांतून उमटत आहे.










