HomeBreaking Newsमूलमध्ये छत्री, कपबशी व बसची जोरदार चर्चा!

मूलमध्ये छत्री, कपबशी व बसची जोरदार चर्चा!

सोनू वाळके,उपसंपादक, लोकवाद न्युज.

मूल::-

मूल नगर परिषदेच्या इतिहासात पहिल्यांदाच एक आगळावेगळा अपक्ष पॅनल मैदानात उतरला असून ‘माझे गांव, माझे सरकार’ हा स्पष्ट ध्यास घेऊन चुनावी रणशिंग फुंकले आहे. प्रचारासाठी वेळ कमी असला तरी शहरात या पॅनलची जोरदार चर्चा होऊ लागली आहे.

मूल नगर परिषदेच्या आगामी निवडणुकीत या वर्षी अनोखा बदल. शहराच्या इतिहासात पहिल्यांदाच ‘माझे गांव, माझे सरकार’ हा स्पष्ट ध्येयविचार घेऊन एक संघटित अपना पक्ष अपक्ष पॅनल निवडणूक रिंगणात उतरला आहे.

प्रचारासाठी वेळ कमी असला तरी या पॅनलची चर्चा शहरभर झपाट्याने पसरत  आहे बाजारपेठांपासून सामाजिक माध्यमांपर्यंत प्रत्येक ठिकाणी या अपक्ष पॅनलच्या आगमनाने नवीन समीकरणे तयार होताना दिसत आहेत.

मागील अनेक वर्षांत मूलच्या राजकारणात आशिर्वादाच्या राजकारणाला अधिक महत्त्व मिळाल्याची टीका नागरिकांनी वारंवार केली आहे

आजवर मूलच्या राजकारणात अनेक ‘भाऊंच्या दयेवर’ किंवा ‘ताऊंच्या आशिर्वादावर’ सत्ता मिळवणारेच पुढे येत होते, पण आता जनता याला कंटाळल्याचे स्पष्ट दिसू लागले आहे. पक्षीय उमेदवारांवरील नाराजी उघडपणे व्यक्त केली जात असून मतदार स्वतंत्र पर्याय शोधत आहेत. हाच पर्याय म्हणून ‘अपना पक्ष अपक्ष पॅनल’ वेगाने जनमानसात पोहचत आहे.

या पॅनलच्या अध्यक्षा गीतांजली शोन तांगडे (छत्री ☂️) यांच्यासह खालील उमेदवार विशेष चर्चेत आहेत:

प्रभाग 2 ब – शुभम गावतुरे (☕)

प्रभाग 3 अ – कुंदा फाले (☕)

प्रभाग 5 अ – उज्वला आकाश भडके

प्रभाग 3 व 5 ब – गिरिधर मोहुर्ले (🚌)

प्रभाग 7 अ – कुणाल गायकवाड सर (☕)

प्रभाग 9 ब – हिरालाल भडके सर (☕)

प्रामाणिक, निर्व्यसनी, कर्तव्यदक्ष आणि लोकांशी शांतपणे संवाद साधण्याच्या पद्धतीमुळे या टीमबद्दल शहरभर सकारात्मक चर्चा सुरू आहे.

शहरातील कॉर्नर, चौक, चहाटळ्या, सोशल मीडियापासून बाजारापर्यंत सध्या फक्त तीनच चिन्हांची चर्चा —
छत्री, कपबशी आणि बस!

lokwad
lokwadhttps://lokwad.in/
दुर्योधन विलास घोंगडे मुख्य संपादक mob. 9881197843
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments