मूल : मूल नगरपरिषद निवडणुकीत प्रभाग क्र. 9 मधून शिक्षक हिरालाल भडके यांच्या उमेदवारीमुळे प्रभागातील स्पर्धा चुरशीची झाली आहे. समाजकार्य, संविधान जागरण आणि जनजागृती यासाठी ओळखले जाणारे भडके हे सामाजिक बांधिलकी जोपासणारे एकमेव सक्रिय शिक्षक म्हणून नागरिकांमध्ये विशेष आदराने पाहिले जातात.
भडके यांनी अनेक वर्षांपासून संविधान जागरण, एप्रिल चिंतन महोत्सव, तसेच विविध सामाजिक उपक्रमांमधून सर्व समाजांना एकत्र आणण्याचे आणि बांधणारी भूमिका बजावली आहे. प्रभागातील युवक, विद्यार्थी, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांमध्ये त्यांची प्रतिमा स्वच्छ, प्रामाणिक आणि लोकाभिमुख अशी आहे.
या सगळ्या कार्यामुळे प्रभाग क्र. 9 मध्ये त्यांची उमेदवारी रंगत आणणारी ठरत असून, प्रतिस्पर्ध्यांसाठी मोठे आव्हान निर्माण झाले आहे. स्थानिक नागरिकांच्या अपेक्षा— “जो समाजासाठी वर्षभर लढतो, त्यालाच संधी मिळाली पाहिजे.”
त्यामुळे यंदाची लढत प्रभाग 9 मध्ये केवळ राजकीय नसून, विचारांची, कामांची आणि जनआस्थेची ठरत असल्याचे चित्र दिसत आहे.