HomeBreaking Newsमूल नगर परिषद निवडणूक : काँग्रेसचा जोरदार कल, भाजपा ‘गेमप्लॅन’ची उत्सुकता वाढविते!

मूल नगर परिषद निवडणूक : काँग्रेसचा जोरदार कल, भाजपा ‘गेमप्लॅन’ची उत्सुकता वाढविते!

सोनू वाळके,उपसंपादक, लोकवाद न्युज.

मूल नगर परिषदेच्या 2 डिसेंबरच्या निवडणुकीची रंगत दिवसेंदिवस वाढत असून, नगरपालिका मैदानावर यंदा चुरशीची परंपरागत लढत पुन्हा पाहायला मिळणार आहे. सत्ता परिवर्तनाची इच्छा व्यक्त करणाऱ्या नागरिकांच्या भावना आणि शहरभर सुरू असलेल्या चर्चेमुळे काँग्रेसकडे जोरदार कल जाणवत आहे.

दुसरीकडे, भाजपा काही दिवसांत कोणते ‘राजकीय डावपेच’ आखते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्यामुळे निवडणुकीचा थरार आणखी वाढला आहे.

काँग्रेस विरुद्ध भाजपा : पारंपरिक लढत पुन्हा एकदा

मूलच्या राजकारणात अनेक वर्षे सुरू असलेला काँग्रेस–भाजपा संघर्ष यावेळी देखील तितकाच तगडा होणार हे स्पष्ट झाले आहे. नगराध्यक्षा पदासाठी दोन्ही पक्षांचे उमेदवार मतदारांमध्ये थेट संवाद साधत असून प्रचाराचा जोर वाढू लागला आहे.

एकता समर्थची दमदार एंट्री, किरण कापगते यांच्याबद्दल चर्चेची लगबग

काँग्रेसच्या एकता प्रशांत समर्थ या नवीन चेहरा असल्या तरी त्यांच्या पतीचा दीर्घ राजकीय अनुभव आणि विकासकामांची जाण या गोष्टी नागरिकांच्या चर्चेत ठळकपणे पुढे येत आहेत.
याउलट, भाजपा उमेदवार किरण किशोर कापगते या सावलीतील प्राध्यापिका असल्याने त्या पूर्णवेळ नगरपरिषदेला देऊ शकतील का? — या प्रश्नांनी जनमानसात चर्चा रंगली आहे.

काँग्रेसचा प्रचार आक्रमक, भाजपा बदलेल खेळी?

काँग्रेसने प्रचाराचा जोरदार झंझावात सुरू केल्याने भाजपा समोर दमदार प्रत्युत्तर देण्याचे मोठे आव्हान आहे. भाजपा कोणती नवी रणनीती आणते, कोणत्या गठजोडी किंवा राजकीय खेळी उलगडते याची उत्सुकता मतदारांत चांगलीच वाढली आहे.

3 डिसेंबरला कोणाचा विजय?

निवडणूक जसजशी जवळ येत आहे, तसतसा प्रचारताप शिगेला पोहोचणार आहे. वातावरणातील तापमान वाढवणाऱ्या या निवडणुकीत सत्तेची बाजी कोण मारणार याचा फैसला 3 डिसेंबरलाच होणार आहे.
मात्र, आत्ताच्या घडीला तरी काँग्रेसचे वजन जड असल्याचे चित्र दिसत आहे.

lokwad
lokwadhttps://lokwad.in/
दुर्योधन विलास घोंगडे मुख्य संपादक mob. 9881197843
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments