मूल : आगामी मूल नगरपरिषद निवडणुकीत नव्या बदलाची चाहूल लागली असून जनतेच्या अपेक्षा पूर्ण करणारे, शिक्षित, तरुण आणि तडफदार उमेदवार मैदानात उतरल्याने परिसरात निवडणूक थेट चुरशीची होण्याची चिन्हे दिसत आहेत.
अध्यक्ष पदासाठी प्रा. गीतांजली तांगडे यांनी अर्ज दाखल करताच नगरमध्ये राजकीय वातावरणात खळबळ उडाली आहे. शिक्षण क्षेत्रातील भक्कम पार्श्वभूमी, समाजकार्यातील सक्रियता आणि पारदर्शक प्रशासनाची हमी देत त्या जनतेसमोर उभ्या ठाकल्या आहेत.
🔹 प्रभाग क्र. 2 – शुभम गावतुरे : तरुण, ऊर्जावान आणि सामाजिक कामांमध्ये आघाडीवर असलेले शुभम गावतुरे यांनी प्रभाग 2 मधील समस्या सोडवण्यासाठी ‘युवा नेतृत्व’ म्हणून जनतेत चांगली लोकप्रियता मिळवली आहे.
🔹 प्रभाग क्र. 3 – कुंदा फाले ,गिरीधर मोहूर्ले,: महिलांच्या हक्कांसाठी सातत्याने लढणाऱ्या कुंदा फाले या अनुभवी समाजकार्यकर्त्या असून, प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी स्पष्ट दृष्टीकोन घेऊन त्यांची मैदानात दमदार एन्ट्री.
गिरीधर मोहूर्ले — स्थानिक पातळीवरील कामांसाठी ओळख, जनसंपर्कात सक्रियता आणि नागरिकांच्या छोट्या-मोठ्या प्रश्नांना प्राधान्य देणारे नेतृत्व म्हणून मोहूर्ले यांची प्रतिमा असून त्यांच्या उमेदवारीवर समर्थकांमध्ये उत्साह निर्माण झाला आहे.
🔹 प्रभाग क्र. 5 – अमृता रोहनकर : स्मार्ट आणि दृढनिश्चयी व्यक्तिमत्त्व असलेल्या अमृता रोहनकर यांची निवडणुकीत एंट्री होताच महिलांमध्ये उत्साहाचे वातावरण. विकासकामांसह स्वच्छता, पाणीपुरवठा व सुव्यवस्था प्राधान्यक्रमात.
🔹 प्रभाग क्र. 7 – कुणाल गायकवाड : तरुण नेतृत्वाचे प्रतिनिधित्व करणारे गायकवाड पायाभूत सुविधा व डिजिटल सुविधांसाठी आग्रही. प्रभागात नव्या पिढीचा मजबूत आवाज म्हणून ओळख निर्माण.
🔹 प्रभाग क्र. 9 – हिरालाल भडके : धडाडीचे शिक्षक म्हणून परिचित असलेले भडके सर सामाजिक बांधिलकी, शैक्षणिक उन्नती आणि प्रशासनातील पारदर्शकतेसाठी ओळखले जातात. त्यांची उमेदवारी जाहीर होताच प्रभागात सकारात्मक वातावरण.
मतदारांमध्ये चर्चेला उधाण — ‘बदलाची टीम’ की जुनी ताकद?
या सर्व उमेदवारांनी “स्वच्छ कारभार, विकासाची हमी व भ्रष्टाचारमुक्त प्रशासन” असा नारा दिल्याने नगरपरिषदेत नव्या राजकीय समीकरणांना वेग आला आहे. शिक्षित व सामाजिकदृष्ट्या सजग उमेदवारांची एन्ट्री होताच मतदारांची अपेक्षा वाढली आहे.
मूल नगरपरिषद निवडणूक यंदा प्रचंड चुरशीची होणार, यात शंका नाही