सोनू वाळके,उपसंपादक, लोकवाद न्युज.
चामोर्शी::-
चामोर्शी–हरणघाट हा महत्त्वाचा मार्ग अक्षरशः मृत्यूदर्शक ठरत आहे. संपूर्ण रस्ता खड्ड्यांनी झाकला असून वाहनचालकांना खड्डा टाळायचा की अपघात याचा निर्णय घेणे कठीण झाले आहे. ठिकठिकाणी रस्ता उखडला, आणि धुळीमुळे प्रवास हा नागरिकांसाठी रोजचा जीवघेणा संघर्ष बनला आहे.
या मार्गावरून शाळकरी मुले, कामगार, शेतकरी, महिलावर्ग, रुग्ण आणि ग्रामीण भागातील शेकडो नागरिक दररोज प्रवास करत असताना रस्त्याच्या दुरवस्थेकडे प्रशासनाने कायमच कानाडोळाच केला आहे, असा आरोप नागरिकांनी केला आहे.चामोर्शी येथील गगंभीर रुग्ण चंद्रपूर हलवताना या रस्त्यावरून चांगलाच दमछाक करावी लागत आहे,रुग्णाला अक्षरशः जीव रडकुंडीला आलं आहे तरीही सार्वजनिक बांधकाम विभाग सुस्त आहे,
काही दिवसांपासून या रस्त्यावर लहानमोठे अपघात वाढले असून दुचाकीस्वारांना पडून दुखापत होण्याच्या घटना सातत्याने वाढत आहेत. कालच रस्त्याच्या दुरवस्था मुळे मालवाहू ट्रक रस्त्याच्या कडेला पलटी होऊन चालक गंभीर जखमी झाला,तरीही प्रशासन याकडे गांभीर्याने लक्ष देत नाही ही शोकांतिका आहे,माणसाला आपल्या हक्कासोबत आता रस्त्यासाठी ही संघर्ष करावा लागत आहे तरी हक्क मिळत नाही, स्त्याच्या नागरिकांचा उद्रेक आता उफाळून आला असून जिल्हाधिकारी यांनी स्वतः हा मार्ग पाहून तात्काळ दुरुस्तीचे स्पष्ट आदेश द्यावेत, अशी जोरदार मागणी करण्यात येत आहे.







