सोनू वाळके,उपसंपादक,लोकवाद न्युज.
महिला बाल विकास कार्यालय गडचिरोली आणि यशोधरा विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने बालविवाह मुक्त अभियान कार्यक्रम राबविण्यात आला.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य शाम रामटेके, गटशिक्षणाधिकारी सुधिर आखाडे , विशेष अतिथी मार्गदर्शक म्हणून प्रियंका आसुटकर संरक्षण अधिकारी, महिला बालविकास कार्यालय गडचिरोली, कल्याणी पुट्टेवार पोलीस उपनिरीक्षक, राजकुमार बुच्चे संरक्षण अधिकारी, अल्का जरुरकर, रविंद्र बंडावार क्षेत्र कार्यकर्ता, महिला बालविकास कार्या. चामोर्शी ,
पुरुषोत्तमजी घ्यार , राजेंद्र अल्लीवर समुपदेशक ग्रामीण रुग्णालय चामोर्शी ,राजू धोडरे उपस्थित होते
यावेळी गावातून जनजागृती रॅली काढून मान्यवरांनी विद्यार्थ्यांना बालविवाहाचे दुष्परिणाम सांगुन त्यापासून दुर राहण्याचे आवाहन केले .
संचालन जयश्री कोठारे तर आभार सरिता आखाडे यांनी मानले
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रविण नैताम, लोकनाथ दुधबळे, निलेश क्षिरसागर, गुरु सातपुते, प्रा. प्रेमानंद वालदे, प्रा. प्रदीप भांडेकर, प्रा. प्रवीण गव्हारे, लक्ष्मण गव्हारे, करुणा रामटेके, आशाताई उंदीरवाडे यांनी सहकार्य केले,