HomeBreaking Newsनवोदय प्रवेश परीक्षा अगदी दारात — पण ऑफिशियल वेबसाइट ठप्प! विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी...

नवोदय प्रवेश परीक्षा अगदी दारात — पण ऑफिशियल वेबसाइट ठप्प! विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी नेमका कोण खेळतोय?

सोनू वाळके,उपसंपादक, लोकवाद न्युज.

नवोदय प्रवेश परीक्षा अगदी दारात — पण ऑफिशियल वेबसाइट ठप्प! विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी नेमका कोण खेळतोय?

 

13 डिसेंबरला होणारी जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा काहीच दिवसांवर आली असताना सर्व विद्यार्थ्यांना अत्यावश्यक असलेले ऍडमिट कार्ड नवोदयच्या अधिकृत वेबसाइटवर जाहीर झाले. मात्र, वेबसाइट गेल्या अनेक तासांपासून पूर्णपणे ठप्प असून विद्यार्थी व पालक प्रचंड अडचणीत सापडले आहेत.

विद्यार्थ्यांना ऍडमिट कार्ड डाउनलोड करता येत नाही… परीक्षा अगदी जवळ… आणि डिजिटल इंडिया म्हणवणाऱ्या यंत्रणेचे सर्व्हर मात्र कोसळले!

**शासन आणि नवोदय प्रशासनाकडे मोठा प्रश्नचिन्ह :

वेबसाइट बंद पडली तर विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक नुकसानीला कोण जबाबदार?**

परीक्षेची तारीख ठरलेली…

ऍडमिट कार्ड ऑनलाईन स्वरूपातच उपलब्ध…

परंतु वेबसाइटच जर सुरु होत नसेल, तर गरीब व ग्रामीण विद्यार्थ्यांचे काय?

अभ्यास, तयारी, मानसिकता यावर प्रचंड परिणाम…

आणि जर वेळेत ऍडमिट कार्ड मिळाले नाही तर? विद्यार्थ्यांचे नुकसान कोण भरून काढणार?

पालकांचा सवाल — “शासनाच्या निष्काळजीपणामुळे आमच्या मुलांचे भविष्य धोक्यात यायला हवे का?”

यंत्रणेची ढिसाळ तयारी उघडी पडली — हजारो विद्यार्थ्यांची ससेहोलपट

दरवर्षी लाखो विद्यार्थी नवोदय परीक्षेला बसतात. एवढ्या मोठ्या प्रमाणावर ट्रॅफिक येणार हे माहित असतानाही सर्व्हरची क्षमता वाढवली नाही, पर्यायी लिंक किंवा हेल्पलाइन तयार केल्या नाहीत.

आणि याचा थेट परिणाम विद्यार्थ्यांवर…

काही पालकांची उद्विग्न प्रतिक्रिया :

“वेबसाइटच चालत नाही… आम्ही काय करायचं?”

“परीक्षा अगदी तोंडावर… अजूनही ऍडमिट कार्ड मिळालं नाही”

“ही जबाबदारी कोण स्वीकारणार?”

आता शासनाने तात्काळ हस्तक्षेप करणे आवश्यक!

सर्व्हर क्षमतेची तात्काळ वाढ

पर्यायी डाउनलोड लिंकची व्यवस्था

जिल्हानिहाय नवोदय केंद्रात ऑफलाइन ऍडमिट कार्ड देण्याची मागणी

विद्यार्थ्यांचे नुकसान टाळण्यास शासन जबाबदार

शेवटचा सवाल —

विद्यार्थ्यांच्या भविष्यावर असा डिजिटल ‘प्रहार’ सहन करणार कोण?

शासन जागं होणार कधी?**

lokwad
lokwadhttps://lokwad.in/
दुर्योधन विलास घोंगडे मुख्य संपादक mob. 9881197843
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments