सोनू वाळके,उपसंपादक, लोकवाद न्युज.
चामोर्शी::-
यशोधरा विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय चामोर्शी व नगरपंचायत चामोर्शी यांच्या संयुक्त विद्यमाने
यशोधरा विद्यालयात घनकचरा व्यवस्थापन जागरूकता कार्यक्रम घेण्यात आला. कार्यक्रमाचे मुख्य मार्गदर्शक म्हणून प्रियंका रंधये , समीर सहारे यांनी विद्यार्थ्यांना स्वच्छतेचे महत्व , घनकचरा व्यवस्थापन, प्लास्टिक बंदी, स्वच्छ व निरोगी पर्यावरण याबाबत माहिती दिली . तसेच विद्यार्थ्यांमार्फत जनजागृतीचा संदेश समाजापर्यंत पोहोचविण्याचा उद्देश सफल केला . विद्यार्थ्यांनी शपथ ग्रहण करून कचरा करणार नाही व आहे त्या कचऱ्याचा आपण पुनर्वापर करण्याचा निर्णय घेतला.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य शाम रामटेके व विशेषअतिथी ज्येष्ठ शिक्षक राजू धोडरे उपस्थित होते .
प्रमुख अतिथी म्हणून , प्रवीण नैताम, लोकनाथ दुधबळे, निलेश क्षिरसागर, प्रा. प्रेमानंद वालदे, प्रा. प्रदीप भांडेकर, प्रा. प्रवीण गव्हारे देखील उपस्थित होते.
संचालन जयश्री कोठारे तर आभार सरिता आखाडे यांनी मानले
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी लक्ष्मण गव्हारे, करुणा रामटेके, आशाताई उंदीरवाडे यांनी सहकार्य केले.