Homeगडचिरोलीचामोर्शी कारमेल अकॅडमी चा अभिमान! कु. गार्गी अमोल आईंचवार हिची स्केटिंगमध्ये चमकदार...

चामोर्शी कारमेल अकॅडमी चा अभिमान! कु. गार्गी अमोल आईंचवार हिची स्केटिंगमध्ये चमकदार कामगिरी.

सोनू वाळके,उपसंपादक, लोकवाद न्युज.

चामोर्शीचा अभिमान!
कु. गार्गी अमोल आईंचवार हिची स्केटिंगमध्ये चमकदार कामगिरी

चामोर्शी : कार्मेल स्कूल चामोर्शीची विद्यार्थिनी कु. गार्गी अमोल आईंचवार इयत्ता 5 वी  हिने नागपूर येथे झालेल्या स्केटिंग स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करत डिव्हिजन लेव्हलवर चौथा क्रमांक पटकावला आहे. तिच्या या यशामुळे  कारमेल अकॅडमी शाळेसह चामोर्शी तालुक्याचा गौरव वाढला आहे.

नागपूर येथे नुकत्याच आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेत विविध जिल्ह्यांतील गुणवान खेळाडूंमध्ये प्रचंड स्पर्धा असताना गार्गीने उत्कृष्ट संतुलन, वेग आणि कौशल्याच्या जोरावर आपली वेगळी ओळख निर्माण केली.

शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षकवृंद तसेच पालकांनी तिच्या यशाबद्दल आनंद व्यक्त करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

क्रीडा क्षेत्रातील गार्गीची प्रगती भविष्यात राज्य व राष्ट्रीय स्तरावरही उज्ज्वल ठरेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

lokwad
lokwadhttps://lokwad.in/
दुर्योधन विलास घोंगडे मुख्य संपादक mob. 9881197843
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments