सोनू वाळके,उपसंपादक, लोकवाद न्युज.
चामोर्शी(भेंडाळा ):- केंद्र स्तरीय बाल क्रीडा व सांस्कृतिक कला महोत्सवाचे तीन दिवशीय भव्य आयोजन विश्वशांती माध्यमिक तथा उच्च विद्यालयाच्या प्रांगणात तर सांस्कृतिक कार्यक्रम ग्रामपंचायतचे भेंडाळा च्या प्रांगणात उत्साहात पार पडले.
या सांस्कृतिक महोत्सवाचे उद्घाटन कुंदाताई जुवारे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी विशेष अतिथी म्हणून
उद्घाटन प्रसंगी बोलताना पोलीस निरीक्षक दिपक डोंब यांनी, “शिक्षणासोबत क्रीडा ही यशाची गुरुकिल्ली असून क्रीडा स्पर्धांच्या माध्यमातून स्वतंत्र करिअर घडविण्याची संधी मिळते.
विद्यार्थ्यांनी घुटखा-तंबाखू व्यसनापासून दूर राहून जिद्द व चिकाटीने प्रयत्न करावेत.”
क्रिडेतुन शारीरिक तर स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासातुन मानसिक क्षमता विकसित करुन आपले स्वप्नपूर्ती ध्येय गाठीत विविध क्षेत्रात उच्च पदावर विराजमान होत आपल्या सोबत आप्तपरीवार,व गावाचे तसेच देशाचे नाव रोशन करावे , असे मत मा.पो.नि. दिपक डोंब यांनी आपले मनोगत व्यक्त करताना व्यक्त केले.









