HomeBreaking Newsडांबरीकरणाला अवघे काही महिने; तरीही MSRDCचा नवीन CC रस्ता — "मार्कंडा-देव" परिसरात...

डांबरीकरणाला अवघे काही महिने; तरीही MSRDCचा नवीन CC रस्ता — “मार्कंडा-देव” परिसरात शासन निधी लुटला जातोय का?

सोनू वाळके,उपसंपादक, लोकवाद न्युज.

 

प्रशासन–कंत्राटदार–अधिकारी” यांचे संगनमत तर नाही ना?

Msrdc अंतर्गत पक्के सिमेंट कॉंक्रेट रस्ते बनवायचे होते तर मार्कंडा देव येथे करोड ची लागत लावून डांबरीकरण रस्ता का बनविला??

जुने संडास-बाथरूम होते उत्तम स्थितीत; तरीही तोडून नव्या बांधकामाला लाखोंची मंजुरी — सार्वजनिक निधीचा अपव्यय

 

चामोर्शी/मार्कंडा देव:

मार्कंडा देव परिसरात काही महिन्यांपूर्वीच लाखो रुपयांचा खर्च करून डांबरीकरण करण्यात आले. पण आश्चर्य म्हणजे, आणि आता पुन्हा एकदा MSRDCकडून नवीन सिमेंट काँक्रेट (CC) रस्त्याचे काम सुरू झाल्याने नागरिकांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे.

स्थानिक नागरिकांचा थेट आरोप आहे की, “डांबरीकरणाची गरज असताना काम केले नाही, आणि आत्ताच्या कामाची अजिबात गरज नसताना पुन्हा लाखो-कोट्यवधींचा खर्च दाखवून शासन निधीची लूट सुरू आहे.”

मागील डांबरीकरणाला अवघे 6–7 महिने — तरीही पुन्हा नवीन काम?

नुकत्याच झालेल्या डांबरीकरणात निकृष्ट दर्जाचा माल वापरला गेला का?

टिकाव नसलेले काम करून आता CC रस्त्याच्या नावाखाली दुहेरी बिलिंग केली जात आहे का?

हे सर्व “प्रशासन–कंत्राटदार–अधिकारी” यांचे संगनमत तर नाही ना?

नागरिकांचा संताप:

“रस्ता चांगला होता, … पण कुणाचातरी हितसंबंध साधण्यासाठी नव्याने msrdc अंतर्गत सिमेंट काँक्रेट  रोड काढला जातोय,” अशी चर्चा आता सर्वत्र होत आहे. शासनाचा निधी वारंवार एकाच कामावर उधळला जात असल्याने लोकांमध्ये संशयाची भावना बळावली आहे.

पारदर्शकता कुठे? MSRDCने नवा सिमेंट काँक्रीट (CC) रोड सुरू केला आहे.

हा निर्णय म्हणजे शासनाच्या पैशांची सरळ-सरळ उधळपट्टी आणि नियोजनाच्या नावाखाली चालणारा आर्थिक गोंधळ असेच नागरिकांचे ठाम मत आहे

नागरिकांकडून खालील मुद्द्यांवर प्रश्नचिन्ह उपस्थित:

मागील कामाची तांत्रिक तपासणी झाली का?

गुणवत्ता नियंत्रण समितीने अहवाल दिला का?

नवीन कामाचे मंजुरीपत्र सार्वजनिक करण्यात आले का?

एकाच रस्त्यावर 6 महिन्यांत दोनदा निधी खर्च का?

चामोर्शी-हरणघाट, बोरी, आष्टी,मुरखळा-चाकलपेठ, अशा गावांतील रस्ते अक्षरशः मरणासन्न अवस्थेत आहेत.

तिथे महिनोंमहिने फाइल फिरत राहते. अधिकारी पहाणे तर दूरच…नुसतं आश्वासन देऊन थाथुर मातूर काम केले

शासनाकडे ठोस मागणी:

रस्त्याच्या मागील कामाची स्वतंत्र तांत्रिक चौकशी

संबंधित अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चिती

निधी गैरवापर झाल्यास गुन्हे दाखल करून वसुली

नागरिकांचा सवाल स्पष्ट आहे —

“मार्कंडा देव परिसरात रस्त्यांचे नावाखाली शासन निधी लुटला जातोय का? आणि त्याला जबाबदार कोण?”

स्थानिक नागरिक स्पष्टपणे सांगतात—

“डांबरावर डांबर टाकल्याशिवाय पैसा खात नाहीत… आणि आता डांबरावर सिमेंट टाकलं तर दोनदा खातात!”

ही चर्चा केवळ जनसमुदायात नाही तर स्थानिक व्यावसायिक, वाहन चालक, सर्वांच्या तोंडी एकच प्रश्न—

या कामासाठी तांत्रिक अहवाल कुठे? गरज काय? जबाबदार कोण?

पारदर्शकतेचे शून्य! MSRDCचे अधिकारी मौनात

जुना खर्च कोण घेणार?

या कोणत्याही प्रश्नांची उत्तरे विभागाकडे नाहीत. अधिकारी फोन उचलत नाहीत, जागेवर भेटत नाहीत, आणि दस्तऐवज दाखवायला तयार नाहीत—असे नागरिकांचे आरोप.कंत्राटदारांची मुजोरी आणि मनमानी चालू आहे

याला भ्रष्टाचार न म्हणायचे तर मग काय?

नुकत्याच केलेल्या रस्त्याचे पुन्हा उकरणे म्हणजे

निधी दुप्पट

✔ काम दुप्पट

✔ नफा तिप्पट

आणि सगळ्यात मोठे म्हणजे

शासनाच्या पैशांचा उघड आणि उघडपणे होणारा गैरवापर

हे नक्की गैरव्यवहार आहे की राजकीय गोडीची परतफेड? याची खुलासा चौकशी करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

lokwad
lokwadhttps://lokwad.in/
दुर्योधन विलास घोंगडे मुख्य संपादक mob. 9881197843
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments