सोनू वाळके,उपसंपादक, लोकवाद न्युज.
धान कापणी बांधणीसाठी मजुर मिळेना शेतकरी विवंचनेत
गडचिरोली(चामोर्शी)::-
चामोर्शी तालुक्यातील बहुतांश भागात धानपिके परिपक्व अवस्थेत आली असून कापणी व बांधणीच्या कामांना सध्या वेग आला आहे. मात्र, ग्रामीण भागात मजुर मिळेनासे झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना अडचणींना सामोरे जावे लागत आहे. यावर्षी मजुरीदरात मोठी वाढ झाली असून शेतीखर्च झपाट्याने वाढल्याने शेतकरी वर्ग चिंतेत आहे. अशा वेळी शासनाची भूमिका काय? असा सवाल शेतकरी बांधवांनी शासन कर्त्याना करीत आहेत.
परिसरात धान कापणीचे काम सुरू आहे.
पारंपरिक पद्धतीने हाताने कापणी करणाऱ्या मजुरांची उपलब्धता कमी असल्याने अनेक शेतकरी हार्वेस्टर मशिनच्या शोधत आहेत. मात्र, मशिनची मागणी वाढल्याने भाडेहीवृत्तीच वाढले आहे.
पूर्वी धान कापणीसाठी प्रतिदिवस २०० ते २५० रुपये मजुरी घेतली जात होती; पण सध्या तीच मजुरी ३०० ते ४०० रुपयांपर्यंत पोहोचली आहे. महिलांनाही बांधणी व ढीग करण्यासाठी ५०० रुपयांपर्यंत मजुरी द्यावी लागत आहे. परिणामी, शेतकऱ्यांच्या उत्पादन खर्चात तब्बल ३० ते ४० टक्क्यांनी वाढ झाली आहे.
हार्वेस्टर मशिनची मागणी वाढली मजुरांची टंचाई लक्षात घेता शेतकऱ्यांकडून हार्वेस्टर मशिन भाड्याने घेण्याकडे कल वाढला आहे. तथापि, मशिन कमी आणि मागणी अधिक असल्याने प्रतीक्षा करावी लागत आहे. एका एकरासाठी मशिनचे दर १२०० ते १५०० रुपये घेतले जात आहेत.
शेतकऱ्यांचा संताप
“पिकं तयार आहेत, पण मजूर मिळत नाहीत. मशिनचे दर गगनाला भिडले आहेत. यापूर्वीच आकस्मिक वादळी पाऊसाने शेतकऱ्यांचे उभे असलेले धान पूर्णपणे शेतात झोपून गेले आहेत. त्यामुळे पहिलेच खूप मोठी नुकसान झाली आहे. पुन्हा कापणी उशिरा झाली तर पावसाचा धोका सांगता येत नाही.
*आकस्मिक पाऊसाने धानाचे उत्पन्न अर्ध्यावर* एकसारखा आकस्मिक वादळी पाऊस आल्याने दरम्यान, तालुक्यात अधूनमधून पडणाऱ्या हलक्या सरींमुळे शेतकऱ्यांच्या धान पिकांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. १० ते १५ एकरातील धान पीक पडून गेल्याने पावसामुळे खाली पडलेले धान कोंब आले आहे. यामुळे अनेक शेतकरी चिंतेत सापडले आहे. कापणी झालेलं धान सुकविण्यास विलंब होत असून पिकावर आर्द्रतेचा परिणाम दिसून येत आहे.
शेती खर्च वाढला, उत्पन्नावर गदा कापणी, बांधणी, वखरणी, वाहतूक या सर्व टप्प्यांमध्ये मजुरी दर वाढल्याने शेतकऱ्यांचे उत्पन्न कमी होण्याची शक्यता आहे. आधीच खतं, बियाणं, इंधन दर वाढल्याने शेती घाट्यात जात असल्याची हकीकत शेतकरी मांडत आहेत.मग अशा प्रसंगी शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहणार का! यावर्षी आकस्मिक अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे धान पीक अर्ध्यावर आले आहे.
लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.विविध शेती साठी लागणारा खर्च वाढतच आह़े. नासधूस होता जे उर्वरित उत्पन्न शेतकऱ्यांच्या हाती येणार त्यालाही शासनाकडून योग्य भाव मिळाला नाही तर मात्र शेतकरी शेती करणे सोडल्याशिवाय दुसरा पर्याय राहणार नाही.
अशी बिकट परिस्थिती शेतकरी बांधवांची आली आहे.