सोनू वाळके, उपसंपादक, लोकवाद न्युज.
सामान्य नागरिकाचा जीव गेल्यास जबाबदार कोण? भरपाई देतील पण गेलेला जीव परत देणार का……??
“रस्ता कोसळतोय, वाहनं मोडतात… पण PWD चामोर्शी दुरुस्तीच्या नावाखाली फक्त आश्वासनं
“शेकडो तक्रारी, रस्ता रोको, निवेदने… तरीही PWD चे इंजिनियर हलत नाहीत!”
“चामोर्शी हरणघाट रस्त्यासाठी जिल्याचे प्रतिनिधित्व करणारे खासदार आणि आमदार मोठ्या मोठ्या विकासाच्या गोष्टी करतात परंतु अजूनपर्यंत या रस्त्याचा विकास मात्र शून्य.”
चामोर्शी::-
चामोर्शी | हरणघाट मार्गाची दयनीय अवस्था दिवसेंदिवस भीषण होत असून, या रस्त्यावरील खड्डे आता वाहनधारक आणि प्रवाशांसाठी जीवघेणा सापळा ठरत आहेत. नागरिकांनी वारंवार बातम्या, निवेदने, रस्ता रोको आंदोलन, धरने अशा असंख्य मार्गांनी आवाज उठवला तरी सार्वजनिक बांधकाम विभाग (PWD) चामोर्शी मात्र कानावर हात ठेवून शांत असल्याची सर्वत्रच चर्चा आहे.








