Homeगडचिरोलीगडचिरोली नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज काँग्रेस पक्षातर्फे भव्य शक्तीप्रदर्शन

गडचिरोली नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज काँग्रेस पक्षातर्फे भव्य शक्तीप्रदर्शन

सोनू वाळके, उपसंपादक, लोकवाद न्युज.
गडचिरोली ::-

गडचिरोली नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज काँग्रेस पक्षातर्फे भव्य शक्तीप्रदर्शन करण्यात आले. या भव्य रॅलीत काँग्रेसच्या नगराध्यक्ष पदाच्या अधिकृत उमेदवार सौ. कविता सुरेश पोरेड्डीवार यांनी, पक्षाच्या सर्व नगरसेवक उमेदवारांसह, मोठ्या जल्लोषात व शिस्तबद्ध पद्धतीने आपले नामांकन अर्ज दाखल केले.

शहरातील जिल्हा काँग्रेस कार्यालयातून निघालेल्या या रॅलीत हजारो कार्यकर्त्यांची उत्स्फूर्त उपस्थिती पाहायला मिळाली. ढोल-ताशांच्या गजरात, घोषणाबाजी आणि मोठ्या जनसमर्थनासह झालेल्या या शक्तीप्रदर्शनामुळे संपूर्ण शहराचा परिसर दुमदुमून गेला.

 

काँग्रेसच्या उमेदवारांना मिळालेला प्रचंड प्रतिसाद पाहता, आगामी निवडणुकीत पक्षाकडे जनतेचा कल स्पष्टपणे झुकत असल्याचे चित्र या वेळी दिसून आले.

lokwad
lokwadhttps://lokwad.in/
दुर्योधन विलास घोंगडे मुख्य संपादक mob. 9881197843
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments