सोनू वाळके,उपसंपादक, लोकवाद न्युज.
मार्कंडा देव, चामोर्शी येथे बिरसा मुंडा जयंतीनिमित्त जल्लोष; क्रांतिसूर्य भगवान बिरसा मुंडा समिती तर्फे भव्य रॅलीचे आयोजन
मार्कंडा देव (ता. चामोर्शी) येथे क्रांतिसूर्य भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त आज उत्साहात कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. भगवान बिरसा मुंडा समितीच्या वतीने भव्य रॅली काढण्यात आली असून परिसरात ऐतिहासिक जल्लोषाचे वातावरण पाहायला मिळाले.
रॅलीची सुरुवात मार्कंडा देव परिसरातील प्रमुख मंदिरापासून करण्यात आली. पारंपरिक ढोल-ताशे, घोषणाबाजी आणि आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडवणारे नृत्यपथक यामुळे वातावरण भारावून गेले होते. स्थानिक नागरिक, युवक, महिला आणि समितीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले.
कार्यक्रमात बिरसा मुंडा यांच्या आदर्श, त्यांचा स्वातंत्र्यलढा आणि आदिवासींच्या हक्कांसाठी केलेल्या संघर्षाचे स्मरण करण्यात आले. समितीच्या पदाधिकाऱ्यांनी समाज एकजुटीचा संदेश देत त्यांच्या विचारांचा प्रसार करण्याचे आवाहन केले.








