Homeगडचिरोलीगडचिरोलीत दलित- बहुजन शक्तीचे एकत्रीकरण , "गडचिरोली परिवर्तन पॅनल" ची अधिकृत घोषणा.

गडचिरोलीत दलित- बहुजन शक्तीचे एकत्रीकरण , “गडचिरोली परिवर्तन पॅनल” ची अधिकृत घोषणा.

सोनू वाळके,उपसंपादक, लोकवाद न्युज.

गडचिरोली परिवर्तन पॅनलची अधिकृत घोषणा

“वनिता बांबोळे” नगराध्यक्ष पदी उमेदवार | लवकरच नगरसेवक साठी यादी जाहीर करणार

गडचिरोली : नगरपरिषद गडचिरोली निवडणूक लढवण्यासाठी गडचिरोली शहरातील सर्व आंबेडकरी पक्ष व विविध सामाजिक संघटना एकत्रित येऊन गडचिरोली परिवर्तन पॅनलची स्थापना केली करण्यात आली. यामध्ये बहुजन समाज पार्टी, वंचित बहुजन आघाडी, अखिल भारतीय रिपब्लिकन पक्ष, आझाद समाज पार्टी व बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी या प्रमुख पक्षासह काही पुरोगामी संघटनांचा सहभाग असून आज पत्रकार परिषदेत अधिकृत घोषणा करण्यात आली.

या पॅनलच्या वतीने नगरपरिषदेच्या सर्व 27 नगरसेवक व नगराध्यक्षाची निवडणूक लढविण्यात येणार आहे.
सर्व उमेदवारांची नावे लवकरच जाहीर करण्यात येतील. नगराध्यक्ष पदासाठी गडचिरोली शहरातील सामाजिक चळवळीतील अग्रस्थानी असलेले नाव तसेच दोनदा नगरपरिषद निवडणूक लढवणाऱ्या *वनिता बांबोळे* यांचे नाव पॅनलच्या कोर कमिटी मध्ये निश्चित करण्यात आले.
गडचिरोली शहराचा सर्वांगीण विकास, पारदर्शक प्रशासन, समता आणि सामाजिक न्याय या उद्दिष्टांना घेऊन ही निवडणूक लढविण्यात येणार असून प्रस्थापित पक्षांसमोर एक सक्षम व परिवर्तनशील आघाडी म्हणून जनतेचा भरघोस प्रतिसाद मिळेल असा विश्वास यावेळी पॅनल चे निमंत्रक तथा ज्येष्ठ आंबेडकरी नेते रोहिदास राऊत यांनी व्यक्त केला .

गडचिरोली परिवर्तन पॅनल ला गडचिरोली शहरातील नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन यावेळी करण्यात येत आहे.

lokwad
lokwadhttps://lokwad.in/
दुर्योधन विलास घोंगडे मुख्य संपादक mob. 9881197843
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments