सोनू वाळके,उपसंपादक, लोकवाद न्युज.
अहेरी :-
अहेरीच्या दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या सर्वांगीण विकासाला वेग देण्यासाठी अहेरी विधानसभा क्षेत्राचे आमदार धर्मराव बाबा आत्राम यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर आठ प्रमुख आणि निर्णायक मागण्या मांडल्या. लोकविकासाच्या प्रत्येक पातळीवर बदल घडवणाऱ्या या मागण्यांना मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत तातडीने कार्यवाहीचे आश्वासन दिले.
मुख्य मागण्या पुढीलप्रमाणे—
• अहेरी जिल्हा निर्मिती लवकरात लवकर करावी
• आष्टी–सिरोंचा मार्गाला गती देऊन काम पूर्णत्वास न्यावे
• आष्टी–मार्कंडा–मूलचेरा मार्गासाठी निधी तातडीने मंजूर करावा
• वनपट्टे वाटप त्वरीत पूर्ण करावे
• वनपट्टाधारकांना बोनसचा लाभ देण्यात यावा
• सिरोंचा एज्युकेशनल हब उभारणीसाठी स्थानिक युवकांना रोजगारात प्राधान्य
• इतर प्रलंबित विकासकामांना गती देण्याची मागणी
मुख्यमंत्री फडणवीस यांनी या सर्व मागण्यांवर तातडीने निर्णय घेण्याचे आश्वासन देत अहेरीच्या विकासाला नवा आयाम देण्याची ग्वाही दिली.
अहेरीच्या विकासाची नवी पहाट आता दूर नाही, असा विश्वास नागरिकांमध्ये वाढला आहे.