HomeBreaking Newsवडसा येथे भाजपाला मोठा धक्का; अनेक कार्यकर्त्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश.

वडसा येथे भाजपाला मोठा धक्का; अनेक कार्यकर्त्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश.

सोनू वाळके,उपसंपादक, लोकवाद न्युज.

 

गडचिरोली:-

गडचिरोली जिल्ह्यातील वडसा येथे भाजपाला मोठा धक्का बसला असून स्थानिक भाजपा कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी आज काँग्रेसचा झेंडा हाती घेतला. काँग्रेस विधिमंडळ गटनेते आमदार विजयभाऊ वडेट्टीवार, आमदार रामदासजी मसराम व गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा उत्साहात संपन्न झाला.

वडसा परिसरातील महत्त्वाचे युवा कार्यकर्ते, स्थानिक पदाधिकारी व सामाजिक कार्यात सक्रिय असलेल्या अनेकांनी भाजपाचा निरोप घेत काँग्रेसच्या धोरणांवर विश्वास व्यक्त केला. या प्रवेशामुळे काँग्रेसची ताकद वडसा तसेच गडचिरोली जिल्ह्यात आणखी वाढणार असल्याचे निरीक्षकांचे मत आहे.

कार्यक्रमात बोलताना आमदार विजय वडेट्टीवार यांनी भाजपा सरकारने विकासाऐवजी आश्वासनांची राजकारण केले असल्याची टीका करत, जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी काँग्रेसच सक्षम पर्याय असल्याचे सांगितले. नव्या कार्यकर्त्यांचे काँग्रेसकडून स्वागत करून त्यांना संघटनेत योग्य स्थान देण्याचे आश्वासनही देण्यात आले.

पक्षप्रवेश कार्यक्रमास मोठी गर्दी उसळली होती. नवीन उत्साहाने काँग्रेसमधील कार्यकर्त्यांनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांत भाजपाला धडा शिकवण्याचा निर्धार व्यक्त केला.

पक्षप्रवेश करणाऱ्यांमध्ये गडचिरोली जिल्ह्यातील वडसा येथील भाजपचे माजी नगराध्यक्ष शामभाऊ उईके, शिवसेनेचे माजी शहराध्यक्ष विकास प्रधान, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे माजी विधानसभा सरचिटणीस हंसराज लांडगे, शिवसेना तालुका सचिव लूनकरण चौधरी, राधेश्यामजी पत्रे, साजन मेश्राम, सहदेव पुराम सह कार्यकर्त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला

lokwad
lokwadhttps://lokwad.in/
दुर्योधन विलास घोंगडे मुख्य संपादक mob. 9881197843
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments