Homeगडचिरोलीडीवायडरवरील हरितीकरण धोक्यात – शेळ्यांचा मुक्त संचार .

डीवायडरवरील हरितीकरण धोक्यात – शेळ्यांचा मुक्त संचार .

सोनू वाळके,उपसंपादक, लोकवाद न्युज.

चामोर्शी:-

हरित महाराष्ट्र, समृद्ध महाराष्ट्र’ या अभियानांतर्गत
गडचिरोलीला सर्वाधिक हरित बनविणे हा उद्देश महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना.देवेंद्र फडणवीस यांनी कोणसरी येथे आले होते त्यावेळी जिल्ह्यात एक कोटी वृक्ष लागवडीचा प्रारंभ केला होता त्यानुसार नुकतेच चामोर्शी येथील हायवेवरील लावलेली झाडे शेळ्या बकऱ्या फस्त करत असल्यामुळे कठडे नियोजना अभावी चांगल्या योजनेचा बट्ट्याबोळ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे . त्यामुळे लावलेल्या झाडाच्या सभोवताल कठडे लावण्याची मागणी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे विभागीय कोषाध्यक्ष संतोष सुरावार यांनी केली आहे.
गडचिरोलीला सर्वाधिक हरित बनविणे घनदाट जंगलामुळे ‘महाराष्ट्राचे फुफ्फुस’ अशी गडचिरोलीची राज्यात ओळख आहे, पण आता जिल्हा देशातील सर्वाधिक हरित व वनाच्छादित बनविण्याचा संकल्प मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २२ जुलै रोजी जिल्ह्यातील कोणसरी आले असता त्यावेळी व्यक्त केला. होता ‘हरित महाराष्ट्र, समृद्ध महाराष्ट्र’ या अभियानांतर्गत जिल्ह्यातील एक कोटी वृक्ष लागवडीचा प्रारंभ मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत २२ जुलैला जिह्यात करण्यात आला होता त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी यापूर्वी वृक्ष लागवड केली होती . आता १० कोटी वृक्ष लागवडीपासून पुढे २५ कोटी वृक्ष लागवडीपर्यंतचा टप्पा राज्य सरकारने निश्चित केला असल्याचे सांगत
आगामी काळात लॉयड्स जेएसडब्ल्यू यांना प्रत्येकी २५ लाख वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट दिले आहे त्यानुसार वृक्ष लागवड नुकतीच चामोर्शी येथील शहरात असलेल्या हायवेवरील डीवायडर वर आणि ओपन पेस , स्मशान भुमि , आय टि आय येथे वृक्ष लागवड केली मात्र झाडे सुरक्षित ठेवण्यासाठी
झाडा भोवती कटडे लावण्याची गरज होती मात्र लावण्याचे
नियोजन केले नसल्याने शेळ्या बकऱ्या ती झाडे फस्त करत आहे .त्यामुळे लावलेल्या झाडांच्या सभोवती संरक्षण करणे लावण्याची मागणी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे विभागीय कोषाध्यक्ष संतोष सुरावार यांनी केली आहे .
lokwad
lokwadhttps://lokwad.in/
दुर्योधन विलास घोंगडे मुख्य संपादक mob. 9881197843
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments