सोनू वाळके,उपसंपादक, लोकवाद न्युज.
चामोर्शी (घोट)
चामोर्शी तालुक्यातील उप पोलीस स्टेशन घोट हद्दीतील माडे मुधोली येथील आरोपी रावजी कान्हु हिचामी, वय- 58वर्ष, धंदा- शेती रा. माडेमुधोली हे अवैधरित्या गांजाची शेती करीत असल्याची गोपनीय माहिती उप पोलीस स्टेशन येथे मिळताच त्याआधारे सपोनी किशोर बप्पासाहेब शिंदे सह
मपोउपनि जया शेळके पोलीस मदत केंद्र घोट यांनी आपल्या चमुसह घटनास्थळ गाठीत तपास केला असता गांजाच्या झाडाची लागवड आरोपी च्या स्वमालकीच्या जागेवर आढळून आल्याने आरोपी नामे- रावजी कान्हु हिचामी यास दि.
05/11/2025 चे 17.00 वाजता आरोपीस अटक करण्यात आली.
सविस्तर हकीकत याप्रमाणे आहे की, मिळालेल्या गोपनीय माहितीवरून नमूद घटना ता. वेळी व ठिकाणी यातील आरोपीच्या स्वतःच्या मालकीच्या शेतशिवाराची गांजा झाडाच्या लागवडीबाबत झडती घेतली असता त्याचे स्वतःचे शेतात गांजा जातीचे ओली झाडे वजन- सुमारे 37 किग्रॅम प्रति किलो विक्री किंमत -50,000/ रु. प्रमाणे एकूण- 18,56,600/- रु. चा मुद्देमाल अवैध्यरित्या शेतात लागवड करीत असल्याचे मिळुन आला.
फिर्यादीचे लेखी रिपोर्ट वरून सदरचा आक्रन्स नोंद करून तपास करीत एन. डि. पि. एस. अंतर्गत गुन्हा नोंद करीत आरोपीस अटक करूनआज दिनांक ६ ऑक्टोंबर रोजी चामोर्शी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने ५ दिवसाची पोलीस कस्टडी घेण्यात आली.
पुढील घटनेचा सखोल तपास पोलीस उपनिरीक्षक जया शेळके करीत आहेत.