सोनू वाळके,उपसंपादक, लोकवाद न्युज.
लहान अधिकाऱ्यांवर अन्याय — बड्यांना राजकीय संरक्षण, महसूल कर्मचाऱ्यांचा तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन!”
तहसील कार्यालय चामोर्शी च्या समोर विदर्भ पटवारी संघाच्या वतीने एक दिवसीय धरणे आंदोलन
विविध प्रलंबित मागण्या शासनाच्या वतीने पुर्ण होणार नाही तो पर्यंत सामुहिक रजा घेऊन करणार आंदोलन विदर्भ पटवारी संघटनेचा पवित्रा.
महसूल विभागाच्या वतीने
मंदीकुट्टा रेती प्रकरणात तलाठी कु. अश्विनी सडमेक आणि मंडळ अधिकारी राजू खोब्रागडे यांना अन्यायकारकपणे निलंबित केल्याच्या निषेधार्थ महसूल कर्मचारी संघटनेतर्फे तहसील कार्यालय समोर चामोर्शी येथे धरणे आंदोलन सुरू करण्यात आले आहे.
राजकीय दबावाखाली रेती घाट प्रकरण दडपले जात असल्याचा आरोप
मंदीकुट्टा रेती घाट हा प्रत्येक वेळी चर्चेत राहणारा घाट असून, संबंधित घाटमालकाची राजकीय क्षेत्रात मोठी ओळख असल्याने महसूल विभागातील कर्मचाऱ्यांना सतत दबावाचा सामना करावा लागत असल्याचे आरोप संघटनेकडून करण्यात आले आहेत.
संबंधित तलाठी आणि मंडळ अधिकारी यांनी अनेक वेळा रेती तपासणी करून घाटमालकाला नियमांचे पालन करण्याची ताकीद दिली होती.
दि. 7, 8, 15 मे व 6 जून 2025 रोजी त्यांनी रेती घाटाचा पंचनामा करून अहवाल तहसीलदारांकडे सादर केला होता.
संबंधित तहसीलदारांनी त्यावर कोणतीही कारवाई केली नाही.
रात्रीची धाड आणि 15 ट्रॅक्टर जप्तीची कारवाई
घाटमालकाने महसूल अधिकाऱ्यांच्या सूचनांकडे दुर्लक्ष केल्याने दि. 10 मे 2025 रोजी, महसूल विभागाच्या संयुक्त पथकाने रात्री सुमारे 1 वाजता मंदीकुट्टा रेती घाटावर धाड टाकून 15 ट्रॅक्टर जप्त केले.
मात्र तत्कालीन तहसीलदारांनी त्यातील 10 ट्रॅक्टर कोणतीही कारवाई न करता सोडले, आणि केवळ 5 ट्रॅक्टरवरच कार्यवाही केली.
यानंतर दि. 4 सप्टेंबर 2025 रोजी, पथकाने अवैध रेती साठवणुकीच्या ठिकाणी जाऊन 5 ट्रॅक्टर, 2 JCB आणि 1 पोकलॅन जप्त करून 15,662 ब्रास रेतीचा पंचनामा सादर केला.
पुरावे दिल्यानंतरही निलंबन — संघटनेचा निषेध:-
या प्रकरणात मा. उपविभागीय अधिकारी अहेरी यांनी तलाठी व मंडळ अधिकारी यांना कारणे दाखवा नोटीस बजावली होती.
दोन्ही अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष भेट देऊन सर्व पुरावे सादर केले. परंतु त्या पुराव्यांचा विचार न करता उपविभागीय अधिकाऱ्यांनी चुकीची माहिती मा. जिल्हाधिकारी यांच्याकडे चुकीची माहीती सादर करण्यात आल्याने तलाठी व मंडल अधिकारी वर कार्यवाही करण्यात आली.
योग्य व सखोल चौकशी न करता वरीष्ठ अधिकारी यांनी संगमताने रेती घाट मालक व तत्कालीन तहसीलदाराला वाचवण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी महसूल अधिकारी व मंडळ अधिकारी यांना दोषी ठरवुन निलंबीत करण्यात आले.
महसूल अधिकारी व मंडल अधिकारी वर करण्यात आलेल्या कार्यवाही च्या निषेधार्थ महसूल संघटणेच्या वतीने तहसील कार्यालय चामोर्शी येथे धरणे आंदोलन करण्यात आले.
जोपर्यंत शासनाच्या वतीने महसूल अधिकारी व मंडळ अधिकारी यांच्या प्रलंबित मागण्या पूर्ण करणार नाही तोपर्यंत सामुहिक रजा घेऊन अधिक तीव्र आंदोलन घेण्याचा पवित्रा संघटनेच्या वतीने घेण्यात येणार असा इशारा संघटनेच्या वतीने वरिष्ठ अधिकारी यांच्याकडे सादर करण्यात आलेल्या निवेदनात नमूद केले आहे.
आंदोलन स्थळी विदर्भ पटवारी संघ उपविभाग शाखा चामोर्शीचे अध्यक्ष जी. जी. वनकर सचिव टीम.बी.झुरे विदर्भ पटवारी संघ तालुका शाखा चामोर्शी अध्यक्ष दिलीप पुंगाटी सचिव वैभव शेरकी यांच्या मार्गदर्शनाखाली सदर धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी तहसील कार्यालय अंतर्गत येणाऱ्या सर्व महसुल मंडळ अधिकारी व महसुल अधीकारी उपस्थित होते.