- सोनू वाळके,उपसंपादक, लोकवाद न्युज.
प्रेस नोट
_डी.एड., बी.एड. धारक उमेदवारांची नाराजी, शासनाचर टाळाटाळ केल्याचा आरोप_
राज्यातील लाखो डी.एड. आणि बी.एड. पदवीधर उमेदवारांनी दिलेल्या शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी (टेट-३) परीक्षेला आता जवळपास सहा महिने उलटले आहेत. दीर्घ प्रतीक्षेनंतर परीक्षेचा निकाल जाहीर झाला. मात्र, या निकालानंतर शिक्षक भरतीची प्रक्रिया अद्याप सुरू न झाल्याने उमेदवारांमध्ये प्रचंड नाराजी आहे. शासनाकडून वारंवार आश्वासने दिली जात असूनही प्रत्यक्षात कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याने युवा शैक्षणिक व सामाजिक न्याय संघटनेच्या वतीने राज्यभर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
संघटनेच्या मते, शिक्षक भरती प्रक्रियेत होणारा विलंब आणि शासनाची उदासीन भूमिका यामुळे पात्र उमेदवार निराश झाले आहेत. अनेक उमेदवार वयोमर्यादेच्या टप्प्यावर पोहोचले असून, त्यांच्या करिअरवर गदा येण्याची शक्यता आहे. सध्या राज्यातील अनेक जिल्हा परिषद शाळा शिक्षकांच्या अभावामुळे दयनीय स्थितीत असून, हजारो विद्यार्थी गुणवत्तापूर्ण शिक्षणापासून वंचित आहेत. नवीन शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीच्या पार्श्वभूमीवर ७५ हजार कंत्राटी शिक्षकांच्या जागी कायमस्वरूपी शिक्षकांची नियुक्ती करणे अत्यावश्यक आहे. या संदर्भात माहिती घेण्यासाठी सहउपसंचालक राजेश शिंदे यांना संपर्क साधला असता तो होऊ शकला नाही.
> आश्रम शाळा, समाजकल्याण शाळेवर पवित्र पोर्टलवर भरती केली जावी ते एक बिंदू एक पदभरती करून प्रतीक्षा यादी लावण्यात यावी. हिवाळी अधिवेशनात आंदोलन करण्यात येणार आहे. संदीप कांबळे, अध्यक्ष, युवा शैक्षणिक व सामाजिक न्याय संघटना महाराष्ट्र
> पवित्र पोर्टलवर होणारी दिरंगाई विद्यार्थ्यांचे भविष्य अंधकारमय करत आहे. शासनाने तातडीने शिक्षक भरती करावी आणि सर्व अभियोग्यताधारकांना न्याय द्यावा. शुभम पाटील , सामान्य अभियोग्यता धारक
> कंत्राटी शिक्षक धोरण रद्द करून, टीईटी पात्र व अभियोग्यताधारक उमेदवारांची कायम नियुक्ती करण्यात यावी, तसेच समूह शाळा धोरणही रह करावे. आकाश बोदेले सामान्य अभियोगयता धारक







