Homeगोंडपिपरीकोठारी अपर तहसील कार्यालय परिसरातील संरक्षण भिंत बांधकामासाठी 49.17 लाखांची प्रशासकीय मान्यता.

कोठारी अपर तहसील कार्यालय परिसरातील संरक्षण भिंत बांधकामासाठी 49.17 लाखांची प्रशासकीय मान्यता.

सोनू वाळके,उपसंपादक, लोकवाद न्युज.

चंद्रपूर(कोठारी):-

आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश

सुरक्षितता आणि सुव्यवस्थेकडे ठोस पाऊल

राज्याचे माजी वने व सांस्कृतिक कार्य मंत्री आमदार  सुधीर मुनगंटीवार यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे बल्लारपूर तालुक्यातील कोठारी येथील अपर तहसील कार्यालयाच्या संरक्षण भिंतीच्या बांधकामासाठी 49 लाख 17 हजार रुपयांची प्रशासकीय मान्यता प्रदान करण्यात आली आहे.

कोठारी येथील अप्पर तहसील कार्यालयाचे बांधकाम सध्या प्रगतीपथावर आहे. या इमारतीसाठी आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकारातून 2 कोटी 50 लाखांचा निधी मंजूर करण्यात आला असून, अंतिम टप्प्यात असलेले हे कार्यालय लवकरच नागरिकांच्या सेवेसाठी उपलब्ध होणार आहे. यामुळे कोठारी व परिसरातील नागरिकांना तहसील कार्यालयीन सेवा स्थानिक स्तरावरच मिळणार आहेत.

संरक्षण भिंत उभारल्यामुळे कार्यालय परिसर अधिक सुरक्षित आणि सुव्यवस्थित होईल. त्यामुळे नागरिकांना कार्यालयीन कामांसाठी येताना स्वच्छ, शिस्तबद्ध आणि सुरक्षित वातावरण उपलब्ध होणार आहे.

आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे तालुक्यातील प्रशासकीय सुविधा अधिक सक्षम व नागरिककेंद्रित बनत आहेत. या मंजुरीमुळे कार्यालयीन कामकाज अधिक सुटसुटीत, जलद आणि सर्वांसाठी सुलभ होण्यास मदत होणार आहे. नागरिकांना आवश्यक सेवा मिळण्याची प्रक्रिया अधिक सोपी आणि व्यवस्थित होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

lokwad
lokwadhttps://lokwad.in/
दुर्योधन विलास घोंगडे मुख्य संपादक mob. 9881197843
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments