Homeगडचिरोलीमुरखळा चक्क छोट्याशा गावातील रजनी सीए फाउंडेशन ची परीक्षा पास

मुरखळा चक्क छोट्याशा गावातील रजनी सीए फाउंडेशन ची परीक्षा पास

मुरखळा चक्क छोट्याशा गावातील रजनी सीए फाउंडेशन ची परीक्षा पास

सामान्य कुटुंबात जन्म घेतलेल्या रजनीला बनायचंय सीए

सोनू वाळके गडचिरोली लोकवाद ; गडचिरोली सारख्या अटी दुर्गम जिल्यातील चामोर्शी तालुक्या अंतर्गत येणाऱ्या मुरखळा चक्क या छोट्याशा गावातील एका सामान्य गरीब कुटुंबात जन्माला आलेली कुमारी रजनी किशोर चलाख ही अवघ्या छोट्या प्री.प्रायमरी शाळे पासून हुशार होती तिची कल्पकता गुरुजनांना पालकांना विचलित करणारि होती. त्यामुळे ही मुलगी भविष्यात आई वडिलाच नाव रोशन करेल ती मोठ यश संपादन करेल यात काहीच शंका नाही हे भाकीत खुद न्यू माउंट कॉन्व्हेन्ट या शाळेचे संस्थापक दुर्योधन घोंगडे यांनी वव्यक्त केले होते. आणि अखेर भाकित खरे ठरले हिने इयत्ता 12 वी (सी.बी.एस ई) परीक्षेत 94.20% गुण घेत पि.एल. श्री. जवाहर नवोदय विद्यालयातून प्रथम क्रमांक मिळवले असून सी ए फाउंडेशन च्या परीक्षेत तिने घवघवीत यश घेत पास झाली आहे. पुढे तिला सी.ए. बनायचे असून तिच्या यशाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.

रजनीचे pre- Primary शिक्षण न्यू माऊंट कॉन्व्हेन्ट चामोर्शी इथे झाले. तर प्राथमिक शिक्षण निशिगंध कॉन्व्हेन्ट इथे झाले. शिक्षण चालू असतानाना तिला शाळेतील कुनघाडकर सर व आधी गुरुजनांचे तथा आई वडिलांचे योग्य मार्गदर्शन लाभले आणि तिची जवाहर नवोदय विद्याल घोट इथे निवड झाली इयत्ता 6 वी ते इयत्ता 10 वी पर्यंतवे शिक्षण घोट इथे झाले परतू सुरुवाती पासूनच सी.ए. बनण्याची इश्चा असणाऱ्या रजनीने  पुढील शिक्षण घेण्याकरिता जवाहर न‌वोदय विद्यालय, अकोला येथे प्रवेश घेतला. यात तिने ।। वीत प्रथम क्रमांक घेत आपल्या गुणवत्तेची झलक दाखवून दिली. नंतर 12 विमधे  सातत्य टिकवत मेहनत घेवून 94:20% गुना सह प्रथम कुत्रांक मिळविला व  सी ए . करताच्या सीए फाउंडेशन परीक्षेत सुधा उत्तम गुणांनी पास होत यश मिळवले आहे. त्यामुळे तिचे स्वप्न आता पूर्ण होणार आहे.  तिने आपल्या यशाचे श्रेय आईवडील व तिला मार्गदर्शन करणाऱ्या गुरुजनांना दिले आहे. तिची हुशारी तिला निश्चितच यशाच्या शिखरावर नेणार यात काहीच शंका नसून तिने आमचे प्रतिनिधी यांचेशी बोलताना तिला पुढे काय बनायचंय यावर मला भविष्यात सीए बनायचंय अशी भावना व्यक्त केली असून त्याकरिता होणारी प्रथम परीक्षा सुद्धा पास झाल्याचे सांगितले.

lokwad
lokwadhttps://lokwad.in/
दुर्योधन विलास घोंगडे मुख्य संपादक mob. 9881197843
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments