Homeआरोग्यचंद्रपूर कॅन्सर रुग्णालयाला पद्मभूषण स्व.रतन टाटा नाव द्यावे - खासदार प्रतिभा धानोरकर...

चंद्रपूर कॅन्सर रुग्णालयाला पद्मभूषण स्व.रतन टाटा नाव द्यावे – खासदार प्रतिभा धानोरकर यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

सोनू वाळके,उपसंपादक,लोकवाद न्युज.

चंद्रपूर:- 

चंद्रपूर येथे महाराष्ट्र शासन आणि टाटा ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने उभारण्यात येणाऱ्या मध्य भारतातील सर्वात मोठ्या कॅन्सर रुग्णालयाला ‘पद्मविभूषण स्व. रतन टाटा कॅन्सर रुग्णालय’ असे नाव द्यावे, अशी लोकहितकारी मागणी खा.प्रतिभाताई धानोरकरांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.

टाटा समुहाने चंद्रपूरसारख्या दुर्गम भागात अत्याधुनिक रुग्णालय उभारण्याचा पुढाकार घेतल्याने विदर्भासह मध्य भारतातील कॅन्सर रुग्णांना यामुळे उपचार मिळणार आहे. त्यांच्या समाजसेवेच्या आणि मानवतावादी योगदानाच्या सन्मानार्थ हे रुग्णालय स्व. रतन टाटा यांच्या नावाने ओळखले जावे, स्व. रतनजींच्या प्रती हीच खरी कृतज्ञता ठरेल, अशी मागणी प्रतिभाताईंनी महाराष्ट्र सरकारकडे केली आहे.

lokwad
lokwadhttps://lokwad.in/
दुर्योधन विलास घोंगडे मुख्य संपादक mob. 9881197843
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments