Homeगडचिरोलीलॉयड मेटलच्या(Llyod Metal) वाहतुकीने आष्टीकर त्रस्त ! धुळीने व आवाजाने नागरिकांचे जीवन...

लॉयड मेटलच्या(Llyod Metal) वाहतुकीने आष्टीकर त्रस्त ! धुळीने व आवाजाने नागरिकांचे जीवन झाले बेहाल.

सोनू वाळके,उपसंपादक, लोकवाद न्युज.

लॉयड मेटलच्या वाहतुकीने आष्टीकर त्रस्त! कंपनी च्या ट्रक ड्राइवर ची दिवसेन दिवस वाढली दादागिरी.

चामोर्शी (आष्टी):-

गडचिरोली जिल्ह्यातील आष्टी परिसरात दररोज लॉयड मेटल कंपनीच्या ट्रक व डंपरची वाहतूक मोठ्या प्रमाणावर होत असून त्यामुळे स्थानिक नागरिकांचा त्रास दिवसेंदिवस वाढत चालला आहे. सकाळपासून रात्रीपर्यंत धुळीचे ढग, प्रचंड आवाज आणि रस्त्यावरील गर्दी यामुळे ग्रामस्थांचे दैनंदिन जीवन अक्षरशः उद्ध्वस्त झाले आहे.

नागरिकांच्या म्हणण्यानुसार, कंपनीच्या वाहनांमुळे रस्त्यांची अवस्था बिकट झाली असून शाळेकडे जाणाऱ्या मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर झाला आहे. अनेक वेळा ग्रामस्थांनी कंपनी प्रशासन व स्थानिक अधिकाऱ्यांकडे तक्रारी केल्या असल्या तरी ठोस उपाययोजना झालेली नाही.

रोजच्या या वाहतुकीमुळे परिसरातील हवा व वातावरण दूषित होत असून आरोग्याच्या तक्रारी वाढताना दिसत आहेत. ग्रामस्थांनी प्रशासनाकडे मागणी केली आहे की, लॉयड मेटल कंपनीने वाहतुकीसाठी ठराविक वेळ ठरवावी, रस्त्यावर पाणी मारण्याची व्यवस्था करावी आणि सुरक्षा उपाय काटेकोरपणे पाळावेत.

जर लवकरच योग्य कारवाई न झाल्यास आष्टीतील नागरिक तीव्र आंदोलनाचा इशारा देत आहेत. त्यात पोलीस प्रशासन सुद्धा बघ्याची भूमिका घेत आहेत काही कारवाई करताना दिसत नाही हा सगळ्यात मोठा प्रश्न नागरिकांना पडलेला आहे.आष्टीतील आंबेडकर चौक हा शहरातील मुख्य चौक असून, विविध तालुक्याला जाणारा मुख्य मार्ग आहे. या आंबेडकर चौकात बसस्थानक, फळे, किराणा दु‌काने आणि हॉटेल्स थाटलेली आहेत. त्यामुळे या मार्गावर खरेदीदार व इतर नागरिकांची गर्दी राहते.

आष्टी येथील आंबेडकर चौकात दुचाकी वाहनधारकांना ये जा करणाऱ्या नागरिकांना लॉईड मेटल च्या पुण्याईने धुळीचा त्रास सहन करावा लागत आहे. या बाबीकडे शासनानी दखल घेऊन मार्ग मोकळा करावा. अन्यथा रस्ता रोको आंदोलन करण्यात येईल असे नागरिकांनी स्पष्ट सांगितले.

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

lokwad
lokwadhttps://lokwad.in/
दुर्योधन विलास घोंगडे मुख्य संपादक mob. 9881197843
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments