Homeगडचिरोलीआरमोरी नगरपरिषदेच्या नगराध्यक्षपदासाठी काँग्रेस पक्षाकडून जयकुमार महादेव मेश्राम यांना उमेदवारी द्यावी, --...

आरमोरी नगरपरिषदेच्या नगराध्यक्षपदासाठी काँग्रेस पक्षाकडून जयकुमार महादेव मेश्राम यांना उमेदवारी द्यावी, — आरमोरीतील विविध समाजघटकांकडून होत आहे मागणी.

सोनू वाळके,उपसंपादक, लोकवाद न्युज.

                    प्रेस नोट

आरमोरी नगराध्यक्षपदासाठी जयकुमार महादेव मेश्राम यांना समाजघटकांचा पाठिंबा

आरमोरी नगरपरिषदेच्या नगराध्यक्षपदासाठी काँग्रेस पक्षाकडून जयकुमार महादेव मेश्राम यांना उमेदवारी द्यावी, अशी मागणी आरमोरीतील विविध समाजघटकांकडून होत आहे. इंदिरा नगर येथील नागरिकांनी तालुका काँग्रेस समितीकडे लेखी अर्ज सादर करून जयकुमार मेश्राम यांच्या उमेदवारीस पाठिंबा जाहीर केला आहे.

श्री. मेश्राम यांनी आरमोरी शहरात शिक्षण, आरोग्य, स्वच्छता, रोजगार निर्मिती आणि सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले असल्याने त्यांना नगराध्यक्षपदासाठी संधी मिळणे गरजेचे असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. त्यांनी सर्व समाजघटकांना एकत्र घेऊन काम करत शहराच्या विकासात मोलाचा वाटा उचलला आहे.

याचबरोबर आरमोरी विविध समाज तसेच आरमोरीतील सुशिक्षित युवा वर्ग यांनीही अशाच प्रकारचे निवेदन लवकरच तालुका काँग्रेस समितीकडे सादर करण्याचे ठरवले असून, जयकुमार मेश्राम यांच्या पाठिंब्याची भूमिका त्यांनी जाहीर केली आहे.

स्थानिक नागरिकांचा विश्वास आहे की, जयकुमार मेश्राम यांच्या नेतृत्वाखाली आरमोरीचा सर्वांगीण विकास होईल आणि शहरात नवे परिवर्तन घडेल.

lokwad
lokwadhttps://lokwad.in/
दुर्योधन विलास घोंगडे मुख्य संपादक mob. 9881197843
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments