Homeगडचिरोलीभेंडाळा येथे आधार केंद्र सुरू करा,राहुल वैरागडे यांचा जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

भेंडाळा येथे आधार केंद्र सुरू करा,राहुल वैरागडे यांचा जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

सोनू वाळके,उपसंपादक, लोकवाद न्युज.

  1. भेंडाळा : नागरिकांना विविध शासकीय तसेच निमशासकीय कामाकरिता आधारकार्डची अत्यंत आवश्यकता आहे. वेळोवेळी निरनिराळ्या कामासाठी आधारकार्ड लिंक करावा लागतो. लाडकी बहीण योजना शासनाने सुरू केलेली आहे. त्यामुळे अनेक महिलांना आपला आधारकार्ड बँक खात्याशी जोडावे लागत आहे. मात्र, भेंडाळा परिसरात आधार केंद्र सहा महिन्यापासून बंद असल्याने लाडक्या बहिणींना तसेच नागरिकांना अडचणीचा सामना करावा लागत आहे.केवळ चामोर्शीच्या पंचायत समितीमध्ये
    आधार केंद्र सुरू असल्यामुळे त्या ठिकाणी मोठी गर्दी दिसून येत आहे. नागरिक व लाडक्या बहिणींच्या सोयीसाठी भेंडाळा येथे आधार केंद्र सुरू करावे, अशी मागणी राहुल वैरागडे, विलास चिचघरे, हेमंत कोवासे यांनी मा.जिल्हाधिकारी यांच्याकडे
    निवेदनातून केली आहे.या समस्येकडे प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आहे.
lokwad
lokwadhttps://lokwad.in/
दुर्योधन विलास घोंगडे मुख्य संपादक mob. 9881197843
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments